50 वर्षाच्या व्यक्तीने इडली खाण्याच्या स्पर्धेत घेतला भाग पण ही स्पर्धा त्याच्या जीवावर बेतली अन् दुर्दैवाने……..

Spread the love

पलक्कड (केरळ) :- इडली हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. अनेकजण सकाळच्या नाष्ट्याला इडलीला प्राधान्य देतात. इडली चटणी, सांबार हा अनेकांचा आवडता नाष्टा आहे. हीच इडली खाण्याची केरळमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 50 वर्षाच्या एका व्यक्तीने सुद्धा या इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. पण इडली खाण्याची ही स्पर्धा त्याच्या जीवावर बेतली. हा व्यक्ती एकापाठोपाठ एक इडली खात गेला, कारण त्याला स्पर्धा जिंकायची होती. पण अचानक एक इडली त्याच्या गळ्यामध्ये अडकली. त्यामुळे त्याला श्वासोश्वास करण्यात त्रास होऊ लागला.

लगेच त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.पलक्कड जिल्ह्यातील कांजीकोड गावातील ही घटना आहे. यगां ओणम उत्सव साजरा होत असताना ही दुर्घटना घडली. 15 सप्टेंबरला काल संपूर्ण केरळमध्ये ओणमचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कांजीकोड गावात काही युवकांनी या सणाच्या निमित्ताने इडली खाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. अनेक युवक या स्पर्धेत सहभागी झाले होते. 50 वर्षाचे सुरेश सुद्धा या स्पर्धेत सहभागी झालेले. कमीवेळेत सर्वाधिक इडली खाणाऱ्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात येणार होतं.

इडली खायला सुरुवात

स्पर्धा सुरु होताच सर्वांनी इडली खायला सुरुवात केली. सुरेश यांनी सुद्धा एकापाठोपाठ एक इडली खायला सुरुवात केली. दुर्भाग्याने एक इडली गळ्याकडे जाऊन अडकली. श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ते तिथेच खाली कोसळले. तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रेफर केलं. तिथे डॉक्टरांना रुग्णाचे प्राण वाचवण्यात अपयश आलं. उपचारादरम्यान सुरेश यांचा मृत्यू झाला.

रडून-रडून वाईट अवस्था

पोलिसांना या घटनेची माहिती दिलीय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुरेश यांच्या कुटुंबियांना या घटनेबद्दल समजताच त्यांच्या घरावर शोककळा पसरली. कुटुंबाची रडून-रडून वाईट अवस्था आहे. ओणमच्या दिवशी आनंदाऐवजी घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी