जळगावात पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेत विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने केला अत्याचार, नंतर विवाहितेसोबत घडलं धक्कादायक..

Spread the love

जळगाव :- महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत.अशातच जळगावमध्ये पती-पत्नीच्या वादाचा गैरफायदा घेत विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर तरुणाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.धक्कादायक म्हणजे लग्नाचे आमिष दाखवत केलेल्या अत्याचारातून पीडित विवाहिता गर्भवती राहिली असून तरुणाने ऐनवेळी लग्नास नकार दिला. हा प्रकार सन २०१८ ते ३० सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात बाहेर गावाहून जळगावात आलेली एक २६ वर्षीय विवाहिता पतीसह राहते. सदर विवाहिता व तिचा पती यांचे नेहमी भांडण होत असल्याचा गैरफायदा घेत विवाहितेच्या ओळखीचा तुषार आहिरे याने ‘पतीला घटस्फोट दे, मी तुझ्याशी लग्न करेल’ असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून विवाहिता गर्भवती राहिली. विवाहितेने लग्नाचा आग्रह केल्यानंतर तरुणाने नकार दिला. याप्रकरणी विवाहितेने शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

गर्भपात करून घेण्याचा सल्ला

अत्याचारातून विवाहिता गर्भवती राहिल्याने ‘आता तरी लग्न कर व मला तुझ्या घरी घेऊन चल’, असे तिने तरुणाला सांगितले असता, ‘माझे लग्न झाले आहे, तु आता गर्भपात करून घे’, असे सांगत विवाहितेसोबत लग्न करण्यास नकार दिला.

मुख्य संपादक संजय चौधरी