धक्कादायक! जिल्हा परिषद शाळेत तीसरीत शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने केला विनयभंग. पालकांमध्ये तीव्र संताप.

Spread the love

संगमनेर :- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या जिल्हा परिषद शाळेत तीसरीत शिकणाऱ्या तब्बल पाच मुलींचा शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.तीसरीत शिकणारी एक मुलगी मधल्या सुट्टीत रडत रडत घरी जाऊन शिक्षकांनी गैरवर्तन केल्याचे आई वडिलांना सांगते.असाच प्रकार त्या चारही मुलीदेखील आपल्या घरी जावून त्याच शिक्षकाविरोधात विनयभंग केल्याची अशीच तक्रार करतात. त्यांनतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. हा प्रकार ऐकून कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला आहे.

बदलापूर मधील घटना घडून काहीच दिवस झाले असून, पुन्हा अशीच घटना अहिल्यानगर जिल्हात घडली आहे. या घटनेत शाळेच्या शिक्षकाचीच विद्यार्थीनींवर अनेक दिवसांपासून वाईट नजर असल्याचे दिसून आले आहे. पीडित मुली इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहेत. त्यामुळे या शिक्षकाविरोधात अधिकच तीव्र संताप कुटुंब आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी असभ्य वर्तन केल्याने शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केल्याने पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . सदर शिक्षकावर कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिकाकडून केली जात आहे. पोलिसकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल उच्च अधिकारी आणि जिल्हाधिकारीकडे पाठविला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी