हृदयद्रावक! एकाच दिवशी डॉ. मुलाचा काविळने तर डॉ. जावयाचा डेंग्यूने दुर्दैवी मृत्यू; एकाच दिवशी दोघांवर अंत्यसंस्कार! हृदय पिळवटून टाकणारी घटना.

Spread the love

नाशिक :- जीवन क्षणभंगुर आहे. काळाच्या पोटात काय दडले आहे, हे कुणीही ओळखू शकले नाही. नियती किती क्रूर असते, याची प्रचिती पहिल्यांदा नामपूरकरांना आली. येथील शिवाजी चौकातील हिरा हॉस्पिटलचे संचालक, भाजपचे ज्येष्ठ नेते, सेवाभावी डॉ. सी. एन. पाटील, जि.प.च्या सदस्या सुनीता पाटील यांना एकुलता एक अविवाहित डॉक्टर मुलगा आणि डॉक्टर जावई यांच्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गुरुवारी घडल्याने शोककळा पसरली आहे.
येथील शिवाजी चौकातील हसतमुख, मितभाषी डॉ. आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत असे.

साधारण वीस दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाल्याने आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. रात्री हजारो जनसमुदायाच्या साक्षीने मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. कोरोनात डॉ. सी. एन. पाटील यांनी जिवावर उदार होऊन नागरिकांची सेवा केली. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉ. पाटील यांची ख्याती आहे. गेल्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात शहरासह मोसम खोऱ्यातील हजारो रुग्णांना त्यांनी संजीवनी दिली. परंतु डॉक्टर मुलगा आणि जावई यांची मृत्यूची अयशस्वी झुंज पाटील-खैरनार कुटुंबीयांवर घाव करणारी आहे.

डॉक्टर मुलाचा काविळमुळे अंत

डॉ. सी. एन. पाटील यांचा मुलगा डॉ. आदित्य चिंतामण पाटील याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतली होती. तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाली होती. आदित्यला उपचारासाठी आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला. मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टर जावयाचे डेंग्यूने निधन

तर दुसऱ्या घटनेत डॉ. सी. एन. पाटील यांचे जावई निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव डॉ. विजय वामनराव खैरनार यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांनी प्राणज्योत मालवली. कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी