मा मंत्री पद्माकरजी वळवी यांच्या विरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्यांचंद्रकांत रघुवंशी यांच्यावर ऑट्रासिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी दिले निवेदन.

Spread the love

एरंडोल | प्रतिनिधी : – येथील भील समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक जळगाव यांना आदिवासी नेते पद्माकर वळवी यांना जीवे ठार मारण्याची शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी धमकी दिल्याने त्यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार ऑट्रासिटी गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात आदिवासी नेते तथा माजी क्रिडा मंत्री पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरु देणार नाही.अशी जीवे ठार मारण्याची धमकी शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली

असुन आदिवासी जिल्ह्यात मूळ आदिवासी नेत्यांनाच धमकी देणे हे आदिवासी बांधव कदापी खपवून घेणार नसल्याचं इशारा दिला असून ही निंदनीय बाब असल्याचे म्हटले आहे तसेच जे कोणी आमच्या समाजाच्या बाजूने बोलत आहेत त्या सर्व आदिवासी नेत्यांचे आम्ही जाहीरपणे समर्थन करीत असून कोणी आदिवासींच्या विरोधात बोलत अथवा धमकावत व आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याच्या हेतूने बोलत आहेत त्यांचा आम्ही जाहीर विरोध करीत असल्याचे म्हटले आहे.चंद्रकांत रघुवंशी यांच्या धमकीमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झाला असून त्यांनी समाजाला डीवचण्याचा प्रयत्न केला असून समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले असल्याचे म्हटले आहे

त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.
निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख सागर वाघ,एरंडोल तालुकाध्यक्ष भैय्या मोरे,युवा तालुकाध्यक्ष निहाल सोनवणे,सखाराम मोरे, मच्छिंद्र मोरे,सुनिल सोनवणे,लश्मण जावळे,राजधर मोरे,विष्णू मोरे,भुषण महाजन,सागर सोनवणे,रिंकू महाजन,इच्छाराम सोनवणे,तेजस पवार,भावेश महाजन दिपक सुर्यवंशी आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी