जामनेर तालुक्यात हजार मुलांमागे फक्त ८४५ मुली —गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टर विषयी किंवा व्यक्तीविषयी माहिती दिल्यास एक लाखाचे बक्षीस

Spread the love

जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यात आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती जामनेर येथे स्त्री भ्रूणहत्येविषयी कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेस पी.सी.पी.एन.डी.टी.च्या सदस्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.नम्रता अच्छा,कायदेशीर सल्लागार ऍड.शुभांगी चौधरी या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत,आशा कुयटे यांची उपस्थिती होती.

रविंद्र सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले तर गटप्रवर्तक नीलिमा गवळी यांनी आभार मानले. गर्भलिंगनिदान केंद्राविषयी, डॉक्टरने याविषयी किंवा एखाद्या व्यक्तीची माहिती देण्यासाठी एक लाख बक्षीस असल्याची माहिती देण्याचे नाव गुप्त ठेवल्यावर १८००२३३४७५ किंवा www.amchimulgi.gov.in वर आपण माहिती देऊ शकता. अशी माहिती दिली.डॉ. स्त्री भ्रूण हत्याकांडाबद्दल विविध चित्रफिती पाहण्यात तसेच स्त्री हत्यावण्या भ्रूणमुक्ती आली.

मुख्य संपादक संजय चौधरी