उत्तेकर मानाची कावड खांद्यावर घेऊन सोबत चालण्याचा योग मिळाला – शिवसेनेचे नेते ॲड नितीन कदम

Spread the love

झुंजार प्रतिनिधी -संतोष कदम
इंदापूर :
कोरोनाचे संकट आता दूर झाले आहे. त्यामुळे यात्रा आणि उत्सव यंदाच्या वर्षी आता मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. सातारच्या शिखर शिंगणापूरची यात्रा देखील या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते.

या यात्रेमध्ये कावड सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्या मधून शेकडो भाविक कावडी सह पवित्र नद्यांचे जल घेऊन अवघड अश्या मुंगी घाटाची चढ करून शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी जातात. यामध्ये इंदापूर तालुक्या मधूनही अनेक कावडी जात असतात. त्यांना इथं मानाच स्थान आहे. त्यांमधील एक इंदापूर तालुक्यातून शिखर शिंगणापूर कडे जाणारी उत्तेकर ही मानाची कावड समजली जाते. या कावडी सोबत शंभर तरुणांचा ताफा निघालेला आहे. ही कावड मजल दर मजल करत इंदापूर, निमगाव केतकी, शिरसटवाडी मार्गे वालचंदनगर, नातेपुते मार्गे शिखर शिंगणापूर येथे महाशिवरात्रि एकादशी दिवशी पोहोचते.

आज निमगाव केतकी चे दरम्यान सदरची कावड खांद्यावर घेऊन शंभू महादेवाला साकडे घालण्याचा योग शिवसेनेचे नेते ॲड नितीन कदम आपला माणूस, तसेच बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत भाऊ साबळे व ॲड. संजय जी चंदनशिवे आणि इतर मान्यवर, भक्तगणांच्या उपस्थिती मध्ये कावडी सोबत चालण्याचा योग आला. अशी भावना शिवसेनेचे नेते ॲड . नितीन कदम यांनी व्यक्त केली. गेली 75 वर्ष या मंडळाच्या वतीने कावड नेण्याचा मान या मंडळाचा आहे. ही परंपरा आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये सुद्धा तरुणांनी जपली आहे. संस्कृती जपण्याचे उत्तेकर मंडळाच्यावतीने कावडी च्या माध्यमातून केली जाते.

टीम झुंजार