VIDEO: सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात भररस्त्यात महिलांची तूफान हाणामारी होताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दोन महिला आहेत. त्यातील एक महिला पोलिस कॉन्स्टेबल दिसत आहे तर दुसरी महिला सामान्य महिला दिसून येत आहे. व्हिडिओत पाहिले तर सामान्य महिला आहे ती कॉन्स्टेबल महिलेला मारताना दिसत आहे. ती महिला अतिशय भयानक पद्धतीने तिला हाणताना दिसत आहे. महिला तिला मारत असताना एक व्यक्ती ही हाणामारी सोडवताना दिसून येत आहे.हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आलेला असून
तो एक्स प्लॅटफॉर्म ‘@gharkekalesh’ या अकाउंटवर पाहता येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, ‘आरपीएफची लेडी कॉन्स्टेबल आणि एका महिलेमध्ये किरकोळ बाचाबाचीनंतर महिलेने कॉन्स्टेबलला केली मारहाण” कॅप्शन देण्यात आलेले आहे. शिवाय व्हिडिओ व्हायरल होताच अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,” बायकांचा नाद करु नका” तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की,” नक्की कोणाची चुकी” तर अजून एका लिहिले आहे की,”कोणाची चुकी असेल” अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.