सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांना खान्देश प्रेरणा पुरस्कार प्रदान

Spread the love

जळगाव येथे दि. 10 रोजी जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयात खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृपचे संस्थापक अध्यक्ष तथा वावडदा ता.जळगाव येथील गौरी उद्योग समुहाचे चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सुमित जानकीराम पाटील यांना “पत्रकारिता” क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना,जळगाव यांच्यावतीने “खान्देश प्रेरणा पुरस्कार २०२२” समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी जळगाव शहराच्या महापौर सौ.जयश्रीताई महाजन,श्री.स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील सर व इतर मान्यवर उपस्थित होते.बापूसाहेब सुमित जानकीराम पाटील यांनी पत्रकारिता च्या माध्यमातून परिसरातील अनेक सामाजिक समस्यांवर आवाज उठवला आहे

तसेच खान्देश मराठा कुणबी समाज वधुवर ग्रुपच्या माध्यमातून हजारो विवाह जुळवले आहेत,सामाजिक कार्यात देखील त्यांचा समावेश असतो,समाजातील अनिष्ट रूढी,हुंडा पद्धत या चुकीच्या पद्धती बंद होण्यासाठी ते सतत जनजागृती करीत असतात.या कार्यासाठी त्यांना खान्देश प्रेरणा पुरस्कार देण्यात आला असे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पदाधिवकाऱ्यांनी सांगितले.पुरस्कार प्राप्ती बद्दल सर्व स्तरातून सुमित पाटील यांचे कौतुक होत आहे.

टीम झुंजार