दुदैवी घटना! म्हसावद गिरणा नदीत दहा वर्षीय चिमुकल्या बाळाच्या नदीत पाय घसरून मृत्यू. दुसऱ्या भावाच्या वाचला जीव.

Spread the love

म्हसावद :(ता. जि.जळगाव) प्रतिनिधी सलीम शाह.
सद्या सगळी कडे पाऊस चालूच आहे. नद्या नाले सर्व फुल्ल वाहत आहे. अशीच अतिशय दुःखद घटना इंद्रानगर म्हसावद या गावात घडलेली आहे. या गावात गिरणा नदीला सद्या पूर आलेला आहे याच नदी काठी हसनेन रफिक शेख वय दहा वर्ष, व नवाज रफिक शेख वय तेरा वर्ष दोघे सख्ये भाऊ नदी कडे खेळत गेले व नदी काठी लहान हसनेन या भावाचा पाय घसरला हे पाहून नवाज ओरडू लागला माझा भाऊ गेला, माझा भाऊ गेला नवाज हा घाबरला व लहान भाऊ आपल्याला हाक मारत आहे, हे पाहून हाक मारत हे पाहून नवाज ने भावाला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली.

पण नवाज याला सुद्धा पोहता येत नसल्या मुळे नवाज पण पाण्या खाली जाऊ लागला थोड्या अंतरावर महिला धुणे धुत असल्या मुळे त्यांना नवाज याच्या आवाज आला व त्या महिलांनी जोर जोरात आवाज लावला. फकीर वाडा येथे काम करणाऱ्या कुर्बान शाह याला हे आवाज ऐकू आला व तो नदी कडे पळु लागला त्याने पहिले दोन मुलं बुडत आहे त्याने पटकन नवाज हा जवड वाहत होता हे कुर्बान ला समज ले व त्याने पहिले नवाज याला बाहेर काढले, पण हसनेन याला फार वेळ होऊन गेल्याने कुर्बान हा हसनेन याला वाचू शकला नाही. हा लहान हसनेन नदी खाली वाहून गेला.

नंतर याची बातमी गावात पसरली व नदी पूल सगळी तुफान गर्दी होऊन गेली. समाज न बगता सगळ्या मुलांनी नदीत उडी घेऊन हसनेन याला शोधायला सुरवात केली बऱ्याच वेळ नदी मुले शोधू लागले एका मुलाला तो हसनेन पाया खाली लागला व त्याला नदीतून बाहेर काढले व दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. हसनेने याचे वडील शेख रफिक हे हात मजुरी स्लॅप चे काम करतात ते स्लॅप वर बाहेर गावी गेलेले होते रफिक शेख यांचा मागे दोन मुलं पत्नी आई असा परिवार आहे. पण दोन मुलांन मधून हसनेन हा आपल्या आई बाबांना सोडून चालला गेला.

मुख्य संपादक संजय चौधरी