जळके येथील 5 MVA ट्रान्सफार्मरचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ! शिरसोली, जळके परिसरातील नागरिकांना होणार फायदा – मंत्री गुलाबराव पाटील

Spread the love

वावडदे.सुमित पाटील | प्रतिनिधी दि. 15 :- तालुक्यातील जळके येथील 5 MVA ट्रान्सफार्मरचे येथे जिल्हा नियोजन व विकास समिती (डी.पी.डी.सी) अंतर्गत मंजूर कामाचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वसंतवाडी उपकेंद्र येथे करण्यात आले. 5 MVA ट्रान्सफार्मरमुळे जळके परिसरातील नागरिकांना होणार फायदा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

आज दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी वसंतवाडी उपकेंद्र येथे 5 एम. व्ही. ए. चे पावर ट्रांसफार्मर चा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे हस्ते पार पडला. सदर पॉवर ट्रान्सफॉर्मर हा डीपीडीसी अंतर्गत मंजूर झालेला होता. सदर पावर ट्रान्सफॉर्मर तसेच तीन फीडर यांच्यासाठी एक कोटी एकवीस लाख इतका खर्च डीपीडीसी या योजनेमार्फत उपलब्ध करून देण्यात आला होता. जळगाव तालुक्यातील शिरसोली विटनेर, जळके, वावडदा, बिलखेडा, बिलवाडी ,वसंतवाडी, सुभाष वाडी ,लोणवाडी या गावातील वीज ग्राहकांना फायदा होणार आहे.

सदर पावर ट्रांसफार्मर मुळे शिरसोली या गावाला जो कमी दाबाचा त्रास होत होता तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे जे प्रमाण होते त्या जाचापासून शिरसोली वीज ग्राहकांची मुक्तता होणार आहे. तसेच विटनेर , सुभाष वाडी लोणवाडी वावडदा बिलखेडा बिलवाडी या गावांना सुद्धा या पावर ट्रांसफार्मर मधून वीज पुरवठा केला जाणार आहे व सदर भागातील घरगुती व्यापारी औद्योगिक व कृषी ग्राहकांना उत्तम दर्जाचा वीज पुरवठा मिळणार आहे. यावेळी तांडा वस्ती सुधार समितीवर ज्ञानेश्वर चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल पालकमंत्री यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता जयंत चोपडे यांनी डीपीडीसी अंतर्ग तमंजूर असलेल्या 5 MVA पॉवर ट्रान्सफॉर्मर बाबत सविस्तर माहिती विशद केली. सूत्रसंचालन दुध संघाचे रमेशआप्पा पाटील यांनी केले तर आभार उपअभियंता विजय कपुरे यांनी मानले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, कार्यकारी अभियंता जयंत चोपडे, अति. कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन, उप अभियंता विजय कपुरे, शाखा अभियंता आकाश सोनवणे, जयेंद्र सपकाळे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, सरपंच चंद्रकांत पाटील, वसंतवाडीचे विनोद पाटील, विटनेरचे ललित साठे, साहेबराव वराडे, गजानन जगदाळे, सुरेश गोलांडे, संदीप सुरळकर, सचिन पाटील, रविंद्र कापडणे, ज्ञानेश्वर चव्हाण, अनिता चिमणकारे पि. के. पाटील, नेहमीचं जैन परिसरातील सरपंच दुध संघाचे संचालक रमेशअप्पा पाटील, यांच्यासह परिसरातील सर्व लोकप्रतिनिधी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी