धरणगाव । कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कार चालक जागीच ठार झाला तर इतर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटनाआज रविवारी धरणगाव तालुक्यातील नांदेड व रोटवद दरम्यानच्या रस्त्यावर घडली.भैय्या मधूकर बारी (वय-२४) रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे मृत चालकाचे नाव असून अनिल विठ्ठल बारी (वय-२४), प्रसाद रामदास गुरव (वय-१९), मोना सुनील चौधरी (वय-१८), सुभाष रामलाल भगत (वय-१९) सर्व रा. शेंदुर्णी ता. जामनेर असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवाशी असलेले पाच तरूण (एमएच १२ एफवाय ०९८८) धरणगावकडून चोपडाकडे जात होते. यावेळी चालक भैय्या बारी यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट शेतात जाऊन पलटी झाली. यात भैय्या बारी यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत इतर चौघे जखमी झाले.
जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले आहेत. तर मयताचा मृतदेह धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीसात नोंद करण्यात आलेली नाही.