साखरपुडा झाला तीन महिन्यांनी दोघांचे लग्न,दोघं गेले फिरायला, क्षुल्लक कारणावरुन झालं दोघात भांडण,युवतीने होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात.

Spread the love

नैनीताल (उत्तराखंड) : साखरपुडा झाल्यानंतर युवक आणि युवती नैनिताल येथे फिरायला आले होते. यावेळी एका क्षुल्लक कारणावरुन नैनीताल येथील माल रोडवर या जोडप्यामध्ये वाद झाला आणि युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली.स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे.

हल्द्वानी येथील युवक आणि युवती शनिवारी आपल्या स्कुटीवर नैनीताल फिरायला आले होते. माल रोडवर फोटो काढताना स्कुटीचा स्टँड चुकून युवतीच्या पायाला लागला. यामुळे चिडलेल्या युवतीने थेट युवकाच्या कानशिलात लगावली. सर्वांसमोर कानशिलात खाल्ल्यावर युवकालाही प्रचंड रांग आला आणि त्याने युवतीला मारहाण करण्यास सुरवात केली. रस्त्यावरच दोघे एकमेकांना मारहाण करू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांना मध्यस्थी केली आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समजले की, दोघांचा साखरपुडा झाला असून, तीन महिन्यांनी दोघांचे लग्न होणार आहे. घटनेनंतर दोघांनी आपली चूक मान्य केली आणि भविष्यात अशी घटना करणार नसल्याचे सांगत माफी मागितली. पोलिसांनी दोघांना समजून सांगत घरी पाठवले. पण, या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी