नवरी मुलगी अल्पवयीन असल्यामुळे लग्न दोन वर्ष पुढे ढकलल्याच्या राग आल्याने नवरदेवाने होणाऱ्या नवरीचा गळा कापून लटकवले झाडाला

Spread the love

कर्नाटक :- कर्नाटक मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येचा आणखी एक थरार कर्नाटकमध्ये समोर आला आहे. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.नवऱ्याने होणाऱ्या बायकोचा खून केला आहे. लग्न पुढे ढकलल्या गेल्यामुळे नवऱ्याला राग आला होता. या रागामधून नवऱ्याने चाकू वार करत त्या मुलीची हत्या केली. त्यानंतर क्रुरतेचा कळस म्हणजे तिला झाडाला लटकवून ठेवले. कर्नाटकातील मडिकेरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून ही नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचे देखील समोर आले आहे.

कर्नाटकमधील या मुलाने होणाऱ्या नवरीचा खून करत तिला झाडाला लटकवले. या हत्येनंतरही देखील आरोपी थांबला नाही. लग्न पुढे ढकलल्यामुळे मुलीच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याची हत्या करण्याचा कट रचत होता. मात्र, मुलीच्या हत्येनंतर केवळ 36 तासांनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश उर्फ ओंकारप्पा असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा एका अल्पवयीन मुलीशी साखरपुडा झाला होता. नवरी मुलगी अल्पवयीन असल्याचे एका अज्ञात व्यक्तीने बाल कल्याण अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर दोघांच्या कुटुंबीयांना लग्न 2 वर्षांसाठी पुढे ढकलण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन्ही कुटुंबीयांनी हे लग्न लावल्यास त्यांच्यावर पोक्सो आणि बालविवाह कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

मुलगी अल्पवयीन असल्यामुळे लग्न पुढे ढकलल्यामुळे प्रकाश उर्फ ओंकारप्पा याने संताप व्यक्त करत मुलीला मारण्याचा निर्णय घेतला. घरी जाऊन नवऱ्यामुलीची हत्या केली. हत्येनंतर मुलीचे मुंडके छिन्नविछिन्न झालेले मुंडके घेऊन त्याने घराजवळील झुडपात लपले. त्यानंतर घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाला त्याने अल्पवयीन मुलाचे छिन्नविछिन्न डोके लटकवले. त्याने रस्त्यावरुन लोकं कमी होताच पळ काढला. मात्र गुन्ह्यात वापरलेला चाकू तेथेच सोडून गेला. आणि जवळच्या जंगलात लपला. यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत कुंभारगडीगे, गरवले, हममियाळा परिसरात तपास सुरू केला. पोलिसांनी प्रकाशला अटक केली असून कुंभारगडिगे येथील त्याच्या राहत्या घराजवळील झुडपातून मुलीचे डोके आणि चाकू जप्त केला आहे.

मोठ्या बहिणीला मारण्याचाही कट

अटकेनंतर पोलिसांनी प्रकाशकडून सिंगल बॅरल बंदूकही जप्त केली. पोलिसांचे म्हणणे आहे की प्रकाशने मृताच्या मोठ्या बहिणीला बंदुकीने ठार मारण्याचा कट रचला होता. नवऱ्या मुलीची मोठी बहीण ही त्यांच्या नात्याच्या विरोधात होती. साखरपुड्याला देखील ती आली नव्हती. मृताची मोठी बहीण गरावळे गावात राहत होती.

मुख्य संपादक संजय चौधरी