ViralVideo:घृणास्पद कृत्य! 8 वर्षापासून घरकामास असलेली कामवालीबाई पिठात लघवी मिसळुन करीत होती चपात्या; कुटुंब आजारी पडल्यानंतर उघडकीस आला प्रकार

Spread the love

Viral Video: दिल्ली: रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ स्वच्छतेची काळजी न घेता कसे बनवले जातात, ते सोशल मीडियावरच्या व्हायरल व्हिडिओजमध्ये अनेकदा दिसतं; पण गाझियाबादमध्ये एक खूपच धक्कादायक घटना घडली आहे.एका बांधकाम व्यावसायिकाकडे घरकाम करणारी महिला तिची लघवी मिसळून स्वयंपाक करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब आजारी पडलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.

दिल्लीजवळ गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका बांधकाम व्यावसायिकाकडे घरकाम करणारी महिला संपूर्ण कुटुंबाला तिची लघवी मिसळलेलं अन्न रोज खायला देत होती. संपूर्ण कुटुंब लिव्हरच्या समस्येमुळे आजारी पडल्यावर त्यांना संशय आला. मग कुटुंबाने किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले. या कॅमेरात घरकाम करणाऱ्या महिलेचं कृत्य कैद झालं. पी़डित कुटुंबाच्या तक्रारीवरून गाझियाबाद पोलिसांनी या महिलेला अटक केली. ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून असे कृत्य करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातल्या एका सोसायटीत एक बांधकाम व्यावसायिक राहतो. पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, व्यावसायिकाच्या पत्नीने सांगितलं, की शांतिनगरला राहणारी रीना नावाची महिला आमच्या घरी गेल्या आठ वर्षांपासून घरकाम करते. घरातली स्वच्छता, भांडी घासण्यासह स्वयंपाकाचं कामदेखील तीच करते. गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबातले सदस्य लिव्हरच्या विकाराने त्रस्त झाले. सुरुवातीला संसर्ग झाला असावा असं समजून आम्ही डॉक्टरांना दाखवलं; पण फरक पडला नाही. हळूहळू संपूर्ण कुटुंब आजारी पडले. त्यामुळे आम्हाला वेगळं काही तरी असल्याचा संशय आला आणि आम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग सर्व प्रकरण उघड झालं. बांधकाम व्यावसायिकाने सांगितलं, की ‘काही दिवसांपूर्वी आम्ही सीसीटीव्हीवर या महिलेचा कारनामा पाहिला. ती तिची लघवी मिसळलेलं अन्न कुटुंबाला खायला घालत होती. कुटुंबातले सदस्य आजारी पडल्यावर आम्हाला तिच्यावर संशय आला. काही दिवसांपूर्वी आम्ही घर आणि किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले; पण त्या महिलेला ही गोष्ट माहिती नव्हती. सोमवारी अन्न शिजवताना त्यात लघवी मिसळताना ती कॅमेरात टिपली गेली. हे पाहून आम्हाला धक्का बसला. त्यामुळे आम्ही क्रॉसिंग रिपब्लिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.’

‘माझे कुटुंबीय रीनावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते. आम्ही तिला आमच्या कुटुंबातली सदस्य मानत होतो. तिच्या प्रत्येक सुख-दुःखात आम्ही सहभागी होत होतो. यापूर्वी आमच्या घरातील महागड्या वस्तू चोरीला गेल्या होत्या; पण आम्हाला तिचा संशय आला नाही. सोमवारी सीसीटीव्हीवर तिचं कृत्य पाहिल्यावर आठ वर्षांचा विश्वास एका मिनिटात उडाला. रीनाच्या या कृत्याचा संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे,’ असं व्यावसायिकाने सांगितलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस त्यांच्या घरी तपासासाठी गेले. चौकशीवेळी रीनाचा व्यावसायिकाच्या पत्नीशी वाद झाला होता. चौकशी सुरू असताना सुरुवातीला महिलेने सर्व आरोप फेटाळून लावले. सीसीटीव्ही फुटेज दाखवताच तिचं बोलणं बंद झालं. ती असं का करत होती, याबाबत तिने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही.

एससीपी (वेव्ह सिटी) लिपी नगायच यांनी सांगितलं, की ‘व्यावसायिकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून घरकाम करणाऱ्या महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ती किचनमध्ये अन्नात लघवी मिसळत असल्याचं फुटेजमध्ये टिपलं गेलं. महिलेला अटक केली असून, पुढची कारवाई सुरू आहे.’

मुख्य संपादक संजय चौधरी