सोलापूर :- सात जन्म सोबत राहून प्रत्येक प्रसंगात एकमेकांना साथ देण्याचं वचन घेतलं आणि ते वचन निभावताना मात्र काळानं घात केला. दक्षिण सोलापूर तालुक्यात पती-पत्नीवर काळानं घात केला आणि दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दक्षिण सोलापुरात शोककळा पसरली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात विहिरीत बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. पत्नी बुडत असताना पती वाचवायला गेला होता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी या गावात घटना घडली आहे. संगप्पा चंदाप्पा कोळी, सुनिता उर्फ सावित्री संगप्पा कोळी असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत.
शेतातील विहिरीत कपडे धुताना पाय घसरून पत्नी पाण्यात पडल्या. त्या विहिरीत बुडाल्या. पत्नीचा आवाज ऐकून पती यांनी विहिरीत उडी घेऊन बुडणाऱ्या पत्नीला वाचविण्यासाठी त्याने विहिरीत उडी घेतली. मात्र पत्नीने पतीला मिठी मारल्यामुळे दोघेही बुडाले. पती-पत्नींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणांच्या माध्यमातून पती-पत्नीचे मृतदेह काढण्यात आले बाहेर. मंद्रूप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पत्नीला वाचवत असताना पतीचाही मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.