एरंडोल:- येथील बसस्थानकावर एरंडोल ते पाचोरा बसमध्ये उत्राण गावी जाण्यासाठी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उषा साहेबराव पाटील यांच्या गळ्यातील ८८००० रूपये किंमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २१ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ १२ ते १२.३० दरम्यान घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उषा साहेबराव पाटील रा. उत्राण या अंगणवाडी सेविका असून २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास बँकेत काम असल्याने एरंडोल येथे आल्या होत्या.
त्यांचे बँकेतील काम आटोपून त्या दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी एरंडोल बसस्थानकावर आल्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यात सोन्याची पोत होती. त्यानंतर १२ .३० वाजता उत्राण बस थांबा असलेली एरंडोल – पाचोरा बस फलाटावर लागली. त्यावेळी बसमध्ये चढणाऱ्यांनी एकच गर्दी केली. यावेळी उषा पाटील या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत गळ्यात आढळून आली नाही. त्यांनी आजुबाजूच्या प्रवाशांजवळ चौकशी केली असता सदरची पोत मिळून आली नाही. यावरून
उषा पाटील यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत गळ्यातील सोन्याची पोत लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. पुढील तपास पो.कॉ.विलास पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बसस्थानकावर अज्ञात चोरट्यांनी महिलांचे दागिने व पैसे लंपास केल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांनी बसमध्ये चढताना व उतरतांना सतर्क राहावे असे आवाहन