खरगोन(मध्य प्रदेश) :- एका व्यक्तीने 2 लग्न केली. दोन महिलांनी एकाच व्यक्ती सोबत सात जन्माचं वचन दिलं. पण दोघींनाही एकत्र मृत्यूने कवटाळलं. दोघींचाही. एकत्र मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना. खरगोन जिल्ह्यातील झिरन्या भागातील रुंदा गावात राहणार्या रेश्ला नावाच्या व्यक्तीला दोन बायका होत्या. एकीचं नाव जिका बाई (35 वर्षे) आणि दुसरीचं नाव सुखमाबाई (36 वर्षे).
दोघीही आपापल्या घराच्या अंगणात उभ्या होत्या आणि मुसळधार पाऊस पडत होता. त्याचवेळी आकाशातून मृत्यू त्यांच्या दिशेने आला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघंही पावसात घराच्या अंगणात उभ्या असताना अचानक वीज पडली आणि दोघांचा जागीच जीव गेला. या घटनेची माहिती समजताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुखमाबाला 4 मुलं आहेत, दोन मुलं आणि दोन मुली. तर जिका बाई निपुत्रिक होती.
पोलिसांनी सांगितलं की, पावसात दोघंही घराच्या अंगणात उभे होते, त्यादरम्यान वीज पडली आणि दोघांनाही त्याचा फटका बसला. दोघांचा जागीच मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही घटना समजल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, या विचित्र घटनेची चर्चा सुरू आहे. झिरण्या भागातील रुंदा गाव महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. हे ठिकाण जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.