लष्करातील जवानाच्या कारनाम्यांची पत्नीने केली पोलखोल; त्यानं 10 वर्षात केली 4 लग्न,अन् पत्नीस प्रेग्नंट करून काढला पळाला.

Spread the love

मेरठ :- लष्करातली नोकरी ही देशसेवा असते, अशा प्रकारे देशसेवा करणारे निश्चितच वंदनीय असतात; पण काही व्यक्ती त्याला गालबोट लावतात. उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये एका महिलेनं सैनिक पतीवर 10 वर्षांत चार विवाह केल्याचा आरोप केला आहे.त्याबद्दल त्याला जाब विचारला असता तो आपल्याला सोडून निघून गेल्याचं पीडित महिलेनं म्हटलं आहे.

लष्करी सेवेत असलेल्या व्यक्तींना समाजात खूप आदर दिला जातो. त्यांना सन्मानाची वागणूक मिळते; पण काही वेळा त्याचा गैरफायदा घेतला जातो. उत्तर प्रदेशातल्या मेरठमधल्या सैनिक असलेल्या एका व्यक्तीनं 10 वर्षांत चार विवाह केल्याचा आरोप त्याच्या पत्नीनं केलाय. आपल्याला तीन वर्षांचा मुलगा असून पतीला जाब विचारला असता मुलासह तो आपल्याला सोडून निघून गेला असंही महिलेनं सांगितलं. पोलीस ठाण्यामध्ये तिची तक्रार चुकीच्या पद्धतीनं लिहून घेतल्याचा आरोपही महिलेनं केलाय. त्यासाठी तिनं एसएसपी ऑफिसचा दरवाजा ठोठावला.पीडित महिला हैदराबादमध्ये राहणारी आहे. तिचा नवरा मनीष हरियाणातल्या कुरुक्षेत्र इथल्या मानेसर अर्बन स्टेटमध्ये राहतो. तो सैनिक असून सध्या लडाखमध्ये तैनात आहे.

2015 मध्ये त्याची बदली हैदराबादमध्ये झाली होती, तेव्हा त्या दोघांचं अफेअर झालं आणि त्यांनी प्रेमविवाह केला. लग्नानंतर काही दिवस सगळं आलबेल होतं; मात्र नंतर मनीषनं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. दिवस गेल्यावर नवरा सुधारेल असं तिला वाटलं; मात्र त्याने महिलेला अ‍ॅबॉर्शन करण्यास भाग पाडलं. मग 2018 मध्ये न सांगताच बेपत्ता झाला. त्यानंतर महिलेनं त्याचा शोध घेतला असता तो मेरठमध्ये असल्याचं तिला समजलं; मात्र तो आधीपासूनच विवाहित असल्याचंही तिला कळालं.पीडित महिलेनं पोलिसात तक्रार करण्याची धमकी नवऱ्याला दिली तेव्हा त्यानं तिच्यासोबत राहण्याचं कबूल केलं. पहिल्या पत्नीला सोडेन असंही त्यानं सांगितलं. मग पीडित महिला आणि तिचा नवरा मनीष कंकरखेडा इथं राहू लागले. फेब्रुवारी 2021मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर नवरा पुन्हा बेपत्ता झाला. ऑगस्ट 2021मध्ये त्याचा शोध लागला तेव्हा तो तक्षशिला कॉलनीमध्ये राहत असल्याचं कळलं; मात्र तिथेही तो दोन महिलांसोबत राहत होता. त्या दोघींशी त्यानं लग्न केलं होतं.

पीडित महिलेनं त्याबाबत नवऱ्याला जाब विचारला असता त्याने तिला घराबाहेर काढलं. या घटनेनंतर कंकरखेडा पोलीस ठाण्यात नवऱ्याविरुद्ध तक्रार दाखल करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केलं, असा आरोप महिलेनं केलाय. नवऱ्याच्या तीन लग्नांबद्दल तक्रारीत काहीच उल्लेख केला नसल्याचं महिलेनं म्हटलंय. त्यामुळेच महिलेनं एसएसपी कार्यालय गाठलं. तिथे एसएसपींनी महिलेची तक्रार ऐकून घेतली आणि पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. महिलेनं केलेले आरोप खरे आढळले, तर त्या व्यक्तीवर कारवाई करण्यासही त्यांनी सांगितलं आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी