लहान भावाचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, मोठा भाऊ ठरत होता अडसर; अन् पुढे जे घडल ते भयंकर.

Spread the love

पिलीभीत :- अनैतिक प्रेमसंबंधांमधून काही वेळेला गुन्हे घडतात. अशा गुन्ह्यांमध्ये मारहाण तसंच हत्येचेही गुन्हे असतात. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये अशाच एका घटनेत लहान भावानं मोठ्या भावाची निर्घृण हत्या केली आहे.पोलिसांच्या मते, लहान भावाचे मोठ्या भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्यानं मोठ्या भावाला मारलं. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये अनैतिक संबंधांमधून भावाभावांमध्ये वैर उत्पन्न होऊन त्यातून एकाची हत्या करण्यात आली आहे. मोठ्या भावाच्या पत्नीशी लहान भावानं अफेअर सुरू होतं. त्यामुळेच त्यानं मोठ्या भावाचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या केली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस साक्षी-पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

पिलीभीतमधील न्यूरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाहरूआ कॉलनीमध्ये राहणारे 40 वर्षीय स्वप्न घोष त्यांची आई प्रताशी घोष यांच्यासोबत गावातल्याच मंदिरात राहत होते. मंदिरात राहून ते देवाची सेवा करत असत. त्याचवेळी त्यांचा धाकटा भाऊ आणि पत्नी घरी राहत असत. त्याचा छोट्या भावानं फायदा घेतला आणि वहिनीशी अफेअर सुरू केलं. ही गोष्ट समजल्यावर लहान भावाने मोठ्या भावाचा काटा काढायचं ठरवलं. गुरुवारी रात्री स्वप्न घोष आईसोबत जेवण करून मंदिरात झोपायला गेला. मध्यरात्री त्याच्या आईला त्याच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी जाऊन पाहिलं असता त्यांचा मोठा मुलगा स्वप्न घोष रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आईचा आवाज ऐकून शेजारीपाजारीही आले.

स्वप्न घोष यांच्या गळ्यावर धारदार हत्यारानं वार करण्यात आले होते. पोलिसांना त्याबाबत कळवण्यात आलं. पोलीस ठाण्याचे अधिकारी अशोक पाल तिथे पोलिसांच्या फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला.पोलिसांच्या मते स्वप्न घोष यांच्या शरीरावर विविध ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. प्राथमिक तपासात स्वप्न घोष यांच्या पत्नीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे लहान भावानंच त्यांची हत्या केल्याचं समोर आलंय. घटनास्थळावरून साक्ष तसंच आणखी पुरावे गोळा करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. आरोपीवर गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे. हत्येसाठी वापरलेलं हत्यारही हस्तगत करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना वारंवार उघडकीस येतात. त्यातही घरगुती हिंसाचार आणि प्रेमप्रकरणांवरून अनेक गुन्हे घडतात. या घटनेत पोलीस आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी