ठाणे:- मुंब्रा शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली येथे राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा निकाह लावण्यात आला आहे. या बालविवाहाची जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्यानी गंभीर दखल घेतली असून निकाह लावून देणाऱ्या मौलाना आणि मुलीच्या आईसह १२ जणांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मुलीच्या वडिलांनी हा प्रकार महिला बाल विकास विभागाच्या लक्षात आणून दिल्यानंतर या घटनेची दखल घेण्यात आली आहे.
पुण्यातील हवेली येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यांत असलेल्या कौटुंबिक वादातून हे दाम्पत्य वेगळे राहत आहे. तक्रारदार यांना दोन मुले आहे. एक १६ वर्षाचा मुलगा आणि १३ वर्षाची मुलगी आहे. हे दोन्ही मुले आईसोबत सोलापूर येथे राहतात. या दांपत्यात अद्याप तलाक झालेला नसून तक्रारदार यांनी मुलाचा सांभाळ करण्यासाठी मुलाचा पत्नीकडे ताबा मागितला. परंतु पत्नीने ताबा देण्यास नकार दिला होता. दरम्यान, तक्रारदार यांची पत्नी आणि सासरच्या मंडळींनी त्यांच्या १३ वर्षीय मुलीचा विवाह मुंब्रा येथील २५ वर्षीय मुलासोबत ठरवला असून ९ ऑगस्ट रोजी हे लग्न होणार असल्याची माहिती तक्रारदार यांना मिळाली