माजी खासदार ए.टी नाना पाटील यांनी बंडखोरी करून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज.

Spread the love

एरंडोल :- एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आज दिनांक 28 ऑक्टोबर सोमवार रोजी भाजपाचे माजी खासदार ए टी नाना पाटील यांनी बंडखोरी करून भारतीय जनता पार्टीच्या एरंडोल व पारोळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करत हजारो महिला व पुरुषांच्या उपस्थितीत शहरात रॅली काढून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

एरंडोल पारोळा  विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली आहे भाजपाचे माजी खासदार ए टी नाना पाटील यांनी बंडखोरी करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज आज दुपारी कासोदा नाका परिसरातील श्रीराम मंदिरात पूजा करून भोई गल्ली मार्गे भगवा चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,मेन रोड, म्हसावद नाका मार्गे तहसील कार्यालय येथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे एरंडोल तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील एरंडोल शहराचे माजी नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, बाजार समितीचे माजी सभापती एस आर पाटील, संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष सुनील भैया पाटील, माजी जि प सदस्य भिकाभाऊ कोळी, सचिन विसपुते, माजी नगरसेवक योगेश महाजन  मंगेश तांबे अमर राजपूत, श्याम ठाकूर निलेश परदेशी ऋषिकेश पाटील,गोलू पाटील,समाधान पाटील महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष मीनाक्षी पाटील तसेच पारोळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष सह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी