एरंडोल :- एरंडोल विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल चिमणराव पाटील यांनी शिअव्सेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी अमोल पाटील यांनी शहरातून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.रॅलीत खासदार स्मिताताई वाघ,आमदार चिमणराव पाटील,आमदार मंगेश चव्हाण,भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर, माजी उपनगरध्यक्षा छाया दाभाडे,मृणाली, पाटील,माजी सभापती रेखाताई चौधरी यांचेसह भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी कॉंग्रेससह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचेकडे अमोल पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून रॅलीस सुरुवात करण्यात आली.महात्मा फुले चौक, नागोबा मधी,अमळनेर दरवाजा,पांडववाडा,भोई गल्ली, मेनरोड, मरीमाता चौक या मार्गावरून रॅली नेण्यात आली.रॅलीचे ठिकठीकाणी पुष्पवृष्टी करून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करण्यात आले.रॅली मार्गावर ठिकठीकाणी महिलांनी अमोल पाटील यांचे औक्षण केले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा फुले,वीर एकलव्य यांच्या पुतळ्यास अमोल पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.रॅलीत सहभागी झालेल्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने संदर्भात विविध घोषणा देत होत्या.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव, शहरप्रमुख बबलू चौधरी,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,डॉ.नरेंद्र ठाकूर,अमोल जाधव,अमोल तांबोळी,भाजप कामगार मोर्चाचे ज्ञानेश्वर पुराणिक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,डॉ.दिनकर पाटील,संभाजी पाटील,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,माजी सभापती अनिल महाजन,माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील,चतुर पाटील,पोपट वंजारी,माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, माजी सरपंच महेश पांडे,प्रभाकर (दादाजी) पाटील,विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,किरण पाटील,माजी नगरसेवक चिंतामण पाटील,दिलीप चौधरी,समाधान चौधरी,कुणाल महाजन,कृष्णा ओतारी,राज पाटील यांचेसह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे व संघटनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, उपजिल्हाध्यक्ष, महायुतीचे समन्वयक, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विधानसभा प्रमुख, तालुकाप्रमुख, तालुकाध्यक्ष, उपतालुकाप्रमुख, उपतालुकाध्यक्ष, शहरप्रमुख, शहराध्यक्ष, उपशहरप्रमुख, उपशहराध्यक्ष, शहरसंघटक, तालुकासंघटक, जिल्हापरिषद, जिल्हा बँक, जिल्हा दुध संघ, पंचायत समिती, नगरपरिषद, बाजार समिती, शेतकी संघ, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, शिक्षण संस्था यांसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-रिपाई यांसह अंगिकृत पक्षांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.