विकास हेच माझे ध्येय…. अपक्ष उमेदवार भगवानभाऊ पाटील (महाजन)

Spread the love

एरंडोल:- मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीच माझी उमेदवारी असल्याचे प्रतिपादन एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भगवान आसाराम पाटील (महाजन) यांनी केले. ते भडगाव तालुक्यातील आमडदे या गावी एका कॉर्नर मीटिंग प्रसंगी बोलत होते. प्रारंभी त्यांनी दत्ताचे दर्शन घेतले. याप्रसंगी अंचळगाव चे सरपंच विजय अण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, भगवान भाऊ महाजन यांच्या सारखी व्यक्ती आमदार झाल्यास आपल्या भागातील सर्व प्रश्न सहज सुटू शकतील म्हणून त्यांच्या पाठीशी सर्व मतदार बंधूंनी उभे राहावे असे आवाहन केले.

यावेळी भगवान भाऊ महाजन, धारागिरीचे बाजीराव पाटील, पत्रकार प्रवीण महाजन व विजय अण्णा पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सुरेश पाटील, पत्रकार लीलाधर पाटील, सुभाष पाटील, राजेश पाटील, नितीन पाटील, निलेश पाटील, पप्पू पाटील, दिनेश पाटील, विजय पाटील, जयवंत पाटील, जगदीश पाटील, लक्ष्मण पाटील व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार निंबा पाटील यांनी केले.

मुख्य संपादक संजय चौधरी