एरंडोल :- येथील पांडवनगरी बहुउद्देशीय संस्था आणि सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने पाडव्यानिमित्त पांडववाड्यासमोर असलेल्या पटांगणावर ५१०० दिवे लाऊन आयोध्या येथील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती.यावेळी मारुती मंदिरात सामुहिक आरती करण्यात आली. शहरात दिवाळीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पांडवनगरी बहुउद्देशीय संस्था,विविध हिंदू संघटना व सकल हिंदू समाजाच्यावतीने पांडववाड्यासमोर पाडव्यानिमित्त पाडवा दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेकडो महिला व युवकांनी पटांगणावर सुमारे ५१०० दिवे लावून आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार केली. यावेळी फटाक्यांची भव्य आतषबाजी करून श्रीराम, बजरंगबली यांच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.तसेच श्रीरामाचे लावण्यात आलेले भव्य फोटो भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी हनुमान मंदिरात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील,हिमालय पेट्रोल पंपाचे संचालक भगवान महाजन डॉ.राखी काबरा,क्षमा साळी,आरती ठाकूर,रवींद्र पाटील, ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,धनश्री इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक राहुल तिवारी, आर.डी. पाटील,सुनील चौधरी,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,परेश बिर्ला,आरती ठाकूर,अर्चना तिवारी यांचेसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली.
पांडववाडा बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.आयोध्या येथील राममंदिराच्या उदघाटनाच्या दिवशी देखील समितीच्यावतीने हजारो दिव्यांची आरास करून राममंदिराची प्रतिकृती करण्यात आली होती. संस्थेतर्फे दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थूबापुंना
उरुसानिमित्त भगवी चादर चढविण्यात येते.शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांनी दिव्यांची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी केली होती.कार्यक्रमास विविध सामाजिक,धार्मिक संघटनांचे पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
पांडववाडा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कुणाल महाजन,बबलू चौधरी,सिद्धार्थ परदेशी,मुन्ना बोरसे, भोला पवार,मयूर बिर्ला,भूषण चौधरी,प्रकाश पाटील, रोहिदास महाजन,नितीन बोरसे,गणेश वाणी,भुरा पाटील,कौस्तुभ मानुधने, उमेश साळी,बजरंग वाणी,भावेश तिवारी,कल्पेश शिंपी,भूषण सोनार
यांचेसह पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,सहाय्यक निरीक्षक गोविंद पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.