एरंडोल:- विधानसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ७ उमेदवारांनी माघार घेतली असून १३ उमेदवार रिंगणात आहेत.त्यात ३ उमेदवार राजकीय पक्षांचे असून अपक्ष उमेदवारांची संख्या १० आहे.यावेळी निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संपूर्ण कामकाजात एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, मुख्याधिकारी अमोल बागुल व निवडणूक नायब तहसीलदार एन.टी.भालेराव यांनी सहाय्य केले.
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे दोन उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एक उमेदवार या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी बंडखोरी करीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.तर शिवसेना उबाठा गटाचे नानाभाऊ महाजन विद्यमान आमदार चिमणराव पाटील व काही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणूक रिंगणात उभे असलेले उमेदवारांची नावे
१) अण्णासाहेब डॉ. सतीश भास्करराव पाटील
२) पाटील अमोल चिमणराव
३) इंजी. प्रशांत दिनकर पाटील
४) अमित राजेंद्र पाटील
५) अनिल रोहिदास जगताप (न्हावी)
६) अण्णासाहेब सतीश भास्करराव पवार(पाटील)
७) दत्तू रंगराव पाटील
८) ए. टी. नाना पाटील
९) भगवान आसाराम पाटील (महाजन)
१०) सुनील रमेश मोरे
११) डॉ. संभाजीराजे आर पाटील
१२) इंजि.स्वप्निल भगवान पाटील
१३) डॉ. हर्षल मनोहर माने (पाटील)
माघार घेतलेल्या उमेदवारांची नावे.
१) हेमलता अशोक पाटील
२) दादा देवराम शिरसाट
३) चिमणराव रूपचंद पाटील
४) शाकीर अहमद अब्दुल सत्तार
५) डॉ. क्रांती संभाजीराजे पाटील
६) गायत्रीबाई भगवान पाटील (महाजन)
७) नानाभाऊ पोपट महाजन