झुंजार प्रतिनिधी। धरणगाव
धरणगाव नगरपरिषद येथे सत्यशोधक, थोर समाज सुधारक, शेतकऱ्यांचे कैवारी, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते तात्यासाहेब महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 195 वी जयंती साजरी करण्यात आली,
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्रशासक तथा मुख्याधिकारी जनार्दन पवार,तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी,माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, नगरसेवक विनय भावे, अंजली विसावे, चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, कार्यालयीन अधीक्षक संजय मिसर ,न पा चे विभाग प्रमुख व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.