भीषण अपघात! बस दरीत कोसळून 36 प्रवाशांचा मृत्यू; प्रवाशांनी खिडकीतून उडी घेण्याचा प्रयत्न केला, पण…’ पहा व्हिडिओ

Spread the love

ऋषिकेश :- “अत्यंत वेदनादायी. हा अपघात महाभयंकर होता. पहिल्यांदा प्रचंड मोठा आवाज झाला, त्यानंतर प्रवाशांनी भरलेली बस घाटातून दरीत कोसळताना दिसली. आपला जीव वाचवण्यासाठी अनेक प्रवाशी बसच्या खिडक्यांमधून उडी घेताना दिसत होते.
या भीषण अपघात मध्ये प्रवासी बस दरीत कोसळली. यात 36 जण ठार झाले आहेत. तीन जखमींना एअरलिफ्ट करुन ऋषिकेश एम्स येथे आणण्यात आलय. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेस्क्यू अभियान पूर्ण झालं आहे.
या बसमध्ये 42 प्रवासी होते. उत्तराखंडच्या अल्मोडा येथे सोमवारी सकाळी हा भीषण अपघात झाला.

या अपघातात बसचं पूर्णपणे नुकसान झालय. स्थानिकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी बोलवण्यात आलय. जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. अल्मोडाच्या SSP सह अनेक मोठे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.

अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

अल्मोडाच्या मार्चुला जवळ हा भीषण अपघात झाला. बस नैनीडांडाच्या किनाथ येथून प्रवाशांना घेऊन चालली होती. बसला रामनगरला जायचं होतं. बस सारड बँड येथे नदीत कोसळली. डोंगराळ भागात हा अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. बस दरीत कोसळल्याच व्हिडिओमध्ये दिसतय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त व मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारने गरजूंसाठी तातडीची मदत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पीएमओकडून ट्विट करण्यात आले आहे की. “उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये झालेल्या रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना माझ्या शोकभावना अर्पित करतो. जखमींना लवकर बरे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.” पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय आदेश दिला?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बस दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार-चार लाख आणि जखमींना 1-1 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. सीएम धामी यांनी पौडी आणि अल्मोडाच्या आरटीओ प्रवर्तनला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी