महात्मा फुले जयंतीनिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल-
येथील महात्मा फुले युवा क्रांती मंचच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहरातून मोटरसायकल रँली काढण्यात आली.तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली.आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते महात्मा फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच प्रतिमा पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

महात्मा फुले युवा क्रांती मंचच्यावतीने दरवर्षी महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते.मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात येत होती.यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.महात्मा फुले युवा क्रांती मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते आणि शासकीय अधिकारी यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमास तहसीलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,देविदास महाजन,रवींद्र महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,ज्येष्ठ पत्रकार प्रा.शिवाजीराव अहिरराव,समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, पी.जी.चौधरी,विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष दुर्गादास महाजन,माजी नगरसेवक योगेश महाजन,संजय महाजन,प्रमोद महाजन,रुपेश माळी,राजेंद्र महाजन,भाजपचे तालुका सरचिटणीस अमोल जाधव,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,प्रा.जितेंद्र महाजन,शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन,युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन,माजी नगराध्यक्षा शोभा महाजन,वर्षा शिंदे,आरती महाजन यांचेसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रा.गौतम निकम यांच्या “लोककल्याणकारी बळीराजा” या पुस्तकाचे सर्वाना वाटप करण्यात आले.तसेच डॉ.सुरेश झाल्टे यांच्या महात्मा फुले यांच्या जिवन कार्यावर आधारी सत्यशोधक समाज या विषयावरील व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सकाळी महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोटर सायकल रँली काढण्यात आली.जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन यांच्या हस्ते रँलीचा शुभारंभ करण्यात आला.मोटर सायकल रँलीचे ठिकठीकाणी स्वागत करण्यात आले.मोटर सायकलवर लावण्यात आलेलेले महात्मा फुले यांचे छायाचित्र असलेले पिवळे ध्वज रँलीचे विशेष आकर्षण ठरले.कार्यक्रमासाठी महात्मा फुले युवा क्रांती मंचच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.

 
टीम झुंजार