जळगाव :- निलकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय पळासखेडे (मि.) ता. जामनेर. इयत्ता 10 वी सन 1998 च्या बॅच चे माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन दि. 5 नोहेंबर 2024, मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थान श्री डी. एल. पाटील सर यांनी भूषविले. व प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री व्ही. आर. पाटील सर, श्री. एस. एस पाटील सर, श्री वराडे सर, श्री लोहार सर, श्री डी. पी. पाटील सर, श्री एस आर पाटील सर, श्री एस सी चौधरी सर, श्री एन वाय पाटील सर, श्री आर एस चौधरी सर, श्री एम एल पाटील सर, श्रीमती एम डी पाटील मॅडम व भरत बापू इ. शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास भोसांडे यांनी केले. व सूत्र संचलन माधुरी पाटील यांनी केले. कार्यक्रमवेळी श्री एस एस पाटील सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना आरोग्याची गुरु किल्ली दिली, आर एस चौधरी सर यांनी ही योग्य मार्गदर्शन केले, त्यानंतर अध्यक्ष्यांनी आपल्या भाषणातून माणूस म्हणून कस जगावं हे सांगितलं. विध्यार्थ्यांपैकी श्री किरण हडप, मनोज सूर्यवंशी, निलेश सोनवणे, संजय वराडे व बापूसाहेब सुमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यापैकी बापूसाहेब सुमित पाटील, नितीन हडप, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, माधव अहिर, प्रमोद पवार, रमेश चोपडे, अनिल हडप, माणिक शिंदे, गोपाल हडप, किरण कोळी, प्रवीण कोळी, आनंदा लोहार, प्रवीण पवार, किशोर सोनार, विजय हडप, सुपडू सपकाळ, गणेश राजपूत, भगवान बोरसे, रतन बोरसे, अर्जुन खोडपे, गणेश भडगे, सतीश राजपूत, ललित वानखेडे,
तुळशीराम पाटील, गोपाळ बोरसे, इ. मुलींमधून मनिषा पाटील, माधुरी पाटील, शैलजा पवार, ललिता पाटील, निर्मला बागुल, रेखा जैन, जयश्री राजपूत, आरती पवार, कौशल्या हिवाळे, पुष्पा काळे, संदीपा पवार, कविता हडप, मुक्ता पवार, मिना परदेशीं, सुवर्णा आगळे इ. विद्यार्थी -विद्यार्थिनी कार्यक्रमांस उपस्थित होते.
शाळेला सर्व विदयार्थ्यांनी 36 नग सिलिंग फॅन सप्रेम भेट दिली.
शेवटी श्री मनोज सपकाळ यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सर्वांनी सोबत स्नेह भोजन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास भोसांडे, किरण हडप, संजय वराडे, खान्देश समाज भूषण बापूसाहेब सुमित पाटील, मनोज सूर्यवंशी, माधव अहिर, किरण कोळी, माधुरी पाटील, आरती पवार, मनीषा पाटील, पद्माकर पाटील, तुकाराम हिवाळे, अनिल हडप, नितीन हडप, माणिक शिंदे यांनी प्रयत्न केले.