झुंजार प्रतिनिधी । आडगाव
आडगाव तालुका एरंडोल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व जाहीर सत्कार सोहळा कार्यक्रम उत्साह पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एरंडोल पारोळा मतदार संघाचे आमदार मा. आबासो. चिमणराव पाटील हे होते कार्यक्रमात त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.महानंदा पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायते, बाजार समितीचे माजी सभापती शालीकग्राम गायकवाड, महाराष्ट्र राज्य कृषी भूषण समाधान पाटील, आडगाव गावचे सरपंच सुनील भिल ,
ह.भ प. मठाधिपती श्री भानुदास महाराज ,डॉ प्रविण वाघ, सुधाकर महाजन ,मोहनदास महाजन ,समाजसेवक नंदू भाऊ मोहिते ,लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील छावा सरपंच वनकोठे , शिवसेना गन प्रमुख डी. एन.अहिरे, रविंद्र पवार,प्रल्हाद पाटील,स्वप्नील पाटील यांचे सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर आडगाव गावचे शेतकरी कुटुंबाचे सुपुत्र हिरामण सीताराम महाजन यांचे सुपुत्र रविंद्र महाजन यांची नागपूर येथे राजपत्रित वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौरव व सत्कार आमदार मा. आबासो. चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .
दरम्यान आबासाहेबानी तरुणांनि आदर्श घेऊन स्वतःला घडवत प्रत्येक क्षेत्रात पुढे गेले पाहिजे असे त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले ज्याप्रमाणे रविंद्र महाजन यांनी पराकाष्ठ करून स्वतःला ह्या पदावर पोचले त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची शिकवण आत्मसात करावी व निरवेशनी राहून स्वतःला देश भक्तीसाठी व समाजाच्या उद्धारासाठी वाहून घ्यावे असे सांगितले.सदर कार्यक्रमाचे आयोजक क्रांती सूर्य युवा ग्रुप व माळी समाज पंच मंडळ यांनी हा कार्यक्रम घडवुन आणला कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तू सर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर महाजन यांनी मांडले.