महाराष्ट्राला भारनियमनाचा “शॉक’; या भागांना बसणार जास्त झटका

Spread the love

मुंबई – राज्यातील काही भागांना भारनियमनाचा शाॅक बसणार आहे. उन्हामुळे त्रासलेल्या जनतेला आता भारनियमनामुळे आणखी जास्त त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. राज्याच्या विविध भागात भारनियमन होणार असल्याचे महावितरणकडून जाहीर करण्यात आले आहे. ज्या भागात वीज चोरी, वीज गळती अधिक आहे. तसेच जिथे वीजबिल चुकवेगीरी वाढली आहे अशा भागात भारनियमन अधिक असणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

माहितीनुसार, मुंबईजवळील काही भाग तसेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश या ठिकाणच्या काही भागांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. तर मुंबईतील मुलुंड, भांडूप, ठाणे, नवी मुंबई अशा ज्या ठिकाणी विजबील रिकव्हरी जास्त आहे अशा ठिकाणी भारनियमन असणार नाही.

दरम्यान, राज्यात कोळसा टंचाईमुळे आधीच 3 हजार मेगावॅट वीजेची तूट आहे. त्यातच उन्हाळ्यामुळे विजेची मागणीही 30 हजार मेगावॅटपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागणी-पुरवठा व्यवस्थापनासाठी हा भारनियमनाचा निर्णय घेतला असल्याचे महावितरणकरून सांगण्यात आले आहे.

टीम झुंजार