देवघरातल्या दिव्यामुळे घराला लागली आग, स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा होरपळून मृत्यू.

Spread the love

कानपूर :- मध्ये आलिशान घरातील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली. या घटनेत व्यापारी, पती-पत्नीसह मोलकरीण होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.संजय श्याम दासानी (48), पत्नी कनिका दासानी (42) आणि मोलकरीण छवी चौहान (24) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. घरात पूजा केल्यानंतर व्यापारी पती-पत्नी दिवे लावल्यानंतर झोपले होते. देवघरातील एका दिव्याला आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. स्वयंचलित दार लॉक झाल्यामुळे पती-पत्नी बेडरूममधून बाहेर पडू शकले नाहीत. दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू झाला.

व्यापाऱ्याचा मुलगा पार्टीवरून परतला तेव्हा त्याला घरातून धूर निघताना दिसला. त्याने आरडाओरड करून जवळच्या लोकांना बोलावले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथकही पोहोचले. आग आटोक्यात आल्यानंतर पती, पत्नी आणि मोलकरणीला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय श्याम दासानी यांची अंबाजी फूड्स नावाची कंपनी असून बिस्किटांचाही कारखाना आहे. व्यापारी संजय श्याम दासानी हे पत्नी, मुलगा आणि मोलकरणीसह पांडू नगरमधील तीन मजली घरात राहत होते. गुरुवारी रात्री त्यांनी पत्नीसह जेवण केल्यानंतर खोलीत झोपायला गेले होते. मोलकरीणही तिच्या खोलीत जाऊन झोपली. देवघरातील दिव्यातून रात्री उशिरा आग लागली. दोघांना वाचवण्यासाठी मोलकरीण खोलीत गेली. आगीमुळे तिघांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी व्यावसायिकाचा मुलगा हर्ष घरी उपस्थित नव्हता, असे कुटुंबीयांनी सांगितले. तो मित्रांसोबत पार्टीला गेला होता. रात्री उशिरा परतले असता घरातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी आसपासच्या लोकांना आणि पोलिसांना याची माहिती दिली.

मुख्य संपादक संजय चौधरी