पारोळा :- सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात आता प्रचाराने जोर धरला आहे. प्रत्येक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने एरंडोल पारोळा विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पारोळा येथे असून आज मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता प्रचार सभा घेण्यात येणार आहे.एरंडोल आणि पारोळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे पक्ष महायुतीचे उमेदवार अमोलदादा पाटील यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार दौरा सुरू झाला आहे. विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे. तस तशी निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला आहे. अमोलदादा पाटील हे देखील मतदार संघात प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. दरम्यान महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोलदादा पाटील यांच्या प्रताप प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पारोळा शहरात येत आहे. या निमित्ताने शहरातील एनइएस हायस्कूलच्या पटांगणात भव्यसभेचे आयोजन आज मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. या सभेला मतदारसंघातील महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासोबत एकलव्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष पवन राजे सोनवणे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
Home ताज्या बातम्या आज संध्याकाळी पारोळा येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची अमोलदादा पाटील यांच्या प्रचारार्थ...