महायुतीचा भगवा झेंडा विधानसभेवर फडकवा …एकनाथ शिंदे
पारोळा शहरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रेकॉर्ड ब्रेक प्रचारसभा, महिलांची उपस्थिती लक्षणीय.
पारोळा : – लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे आणि पैसे कुठून आणणार, असे म्हणणारे विरोधक आता ‘बहिणी’ला तीन हजार रुपये देणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे आता ते पैसे आणणार कुठून? असा प्रश्न उपस्थित होत असुन महाविकास आघाडीने महायुतीचा वचननामा चोरून नवा वचननामा बनविला आहे, अशी टीका करुन समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणीची गर्दी बघून विरोधकांना धडकी भरली असुन येणाऱ्या निवडणुकीत अमोल पाटलांना मोठया मतधिक्याने विजयी करुन
महायुतीचा भगवा झेंडा विधानसभेवर फडकवा असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली.
पारोळा येथील एन ई एस हायस्कुलच्या प्रांगणात महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्राचारार्थ आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते .व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिताताई वाघ आमदार चिमणराव पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे , सुरेंद्र बोहरा, शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर पाटील, रवींद्र जाधव, बाजार समितीचे माजी सभापती शालिकभाऊ गायकवाड, माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, माजी नगरसेवक अशोक चौधरी डॉ. नरेंद्र ठाकूर, जगदीश ठाकुर,अमोल जाधव संजय साळी,प.स. माजी सभापती अनिल महाजन, युवा सेना माजी तालुकाध्यक्ष बबलू पाटील, प्रसाद दंडवते, बबलू पैलवान अमोल तंबोली अतुल मराठे कृणाल महाजन कासोदा सरपंच महेश पांडे, सुदाम राक्षे, जिल्हा बँकेच्या संचालक दगडू चौधरी, आडगाव उपसरपंच दिलीप पाटील, यांचेसह शिवसेना भाजपा राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की या भूमित महाविकास आघाडीच्या बकासुराला गाडण्यासाठी आलो असुन गेल्या आडिच वर्षाच्या कार्यकाळात एरंडोल मतदार संघाला तीन हजार कोटीचा निधी महायुतीच्या कार्यकाळात दिला . नाही तर पहिल्या आडिच वर्षात निधी साठी झटावं लागत होतं या पुढे अमोल पाटीलला निवडून दया
निधीची कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली
मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला विरोध केला. योजनेत खोडा घातला; आता त्यांना जोडा दाखवा. लाडकी बहीण, वयोश्री योजना, युवा प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ व शेतकऱ्यांच्या अनेक योजनांत चौकशी करून तुरुंगामध्ये टाकू असे सांगितले; परंतु त्यांनी मुंगी तरी त्यांनी कधी मारली का? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यासाठी तुरुंगामध्ये जायची वेळ आल्यास शंभरवेळा जाईल, असेही ते म्हणाले.
…कमी समजणाऱ्यांचे सरकार उलथविले…
अहंकारी राजा असला की अहंकाराला संपवण्यासाठी उठाव करावा लागतो लोक सत्तेच्या वाजून जातात आम्ही सत्तेच्या विरोधात गेलो या राज्याला अधोगती कडे नेणाऱ्या बरोबर आम्ही राहून पाप ओढून घेऊ शकलो नाही म्हणून पन्नास आमदार तेरा खासदारांनी टोकाचे पाऊल उचलून सरकारच्या बाहेर पडून टांगा पलटी घोडा फरार केला .
…४५ हजार पाणंद रस्ते करणार…
मुख्यमंत्री म्हणाले, की पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिनीना पंधराशे रुपया वरुन एकवीसशे रुपये करणार , २५ लाख तरुणांसाठी रोजगार निर्मितीसह दहा हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल. ४५ हजार पाणंद रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे, अंगणवाडी, आशा स्वयंसेविकांना १५ हजार रुपये मानधन, शेतकऱ्यांना ७ एचपी विद्युत मोटारीपर्यंत वीजबिल माफ करण्यात येईल व इतर बिलात ३० टक्के सूट देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
…आम्ही घेणारे नव्हे तर देणाऱ्या मधील आहोत …
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू करणार असुन शेतकऱ्यांचे कर्जमाफ करणार आहोत कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगत आम्ही देणार यामध्ये आहोत घेणाऱ्यामध्ये नव्हे असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता टोला लागविला .
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिताताई वाघ , आमदार चिमणराव पाटील एरंडोल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल पाटील यांची समयोजित भाषणे झाली