पहा व्हिडिओ
एरंडोल :- शहरात अपक्ष उमेदवार भगवान आसाराम पाटील (महाजन) यांच्या प्रचारासाठी एरंडोल शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन शहरात प्रचार रॅली काढली, या प्रचार रॅलीची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. अमळनेर दरवाजा पांडववाडा राम मंदिर, भोई गल्ली, भगवा चौक, मेन रोड, गांधीपुरा म्हसावद नाका मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या प्रचार रॅलीच्या समारोप करण्यात आला या प्रचार रॅलीत शहरातील हजारो नागरिकांनी तसेच मोठ्या प्रमाणात महिलांनीही आपला सहभाग नोंदवला होता.
दरम्यान या प्रचार रॅलीत अपक्ष उमेदवार भगवान महाजन हे मतदार संघातील दुसऱ्या गावात प्रचारासाठी गेले असतांना त्यांच्या जागी त्यांच्या सौभाग्यवती गायत्रीबाई महाजन ह्या उपस्थित होत्या त्यांच्यासोबत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. या प्रचार रॅलीत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.