एरंडोल :- विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे शेतकरी पुत्र डॉ. हर्षल माने यांना एरंडोल पारोळा भडगांव तालुक्यातील गावागावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षांपासून मतदार संघात चांगला संपर्क ठेवला असून त्यांनी मतदार संघातील दोन तालुके व एका जिल्हापरिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून. रिंगणगाव विखरण जि.प गटात आज प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या जिल्हा परिषद गटात शेतकरी पुत्र डॉ. हर्षल माने यांना नागरिकांना कडून जोरदार प्रतिसाद मिळत होता यावेळी महिला औक्षण करून विजयी होण्याच्या आशीर्वाद देत आहेत.
पिंपळकोठा येथे गावातील मतदारांनी प्रचार फेरी काढण्यासाठी घोड्याची व्यवस्था केली होती. डॉ. हर्षल माने यांनी घोड्यावर बसण्यास नकार दिला व म्हणाले की शेतकरी पुत्र आहे आपण सर्व माय बाप मतदारांनी मला मतदान रुपी आशीर्वाद देवून विजयी केले तर तेव्हा मी तुमच्या गावी येवून घोड्यावर बसून विजयी मिरवणूक काढेन असे सागून पायीच प्रचार रॅली काढली.त्याच्या हा साधेपणा पाहून नागरिकांनी त्यांना विजयी होण्याच्या आशीर्वाद दिला.
अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांना जनतेचा साथ व आशीर्वाद मोठया प्रमाणात मिळत आहे हाच वाढता प्रतिसाद बघून आज एरंडोल, पारोळा,मतदार संघातील विरोधकांना धडकी भरल्याचे चिन्ह समोर येत आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातले आमदार डॉ. हर्षल माने यांना बघण्याची लोकांची भूमिका असून सर्वसामान्य जनतेत व मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे…