महाराष्ट्र राज्य भर कार्यरत असणारी “शबरी माता संघटना” यांनी एरंडोल पारोळा मतदारसंघात असलेल्या बहुजन, दलित, आदिवासी आणि वंचित घटक, महिला, शेतमजूर यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ संभाजीराजे आर पाटील हेच एकमेव लोकप्रतिनिधी असल्याचे सांगत आपल्या संघटनेतर्फे जाहीर पाठींबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष श्री दीपक बर्डे यांनी जाहीर पाठींब्याचे पत्रक जारी करून तालुका अध्यक्ष श्री नागो भिवा भिल यांच्यासह पदाधिकारी यांनी डॉ संभाजीराजे आर पाटील यांची प्रचार रॅलीत भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.
आजपर्यंत सुरु असलेल्या भ्रष्ट व्यवस्थेने योजनाचा लाभ मिळवून न दिल्याने या घटकांना आजही अडचणींचा सामना करावा लागतोय परंतु या एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा निवडणुकीत एक चांगला, उच्चशिक्षित आणि सक्षम उमेदवार म्हणून डॉ संभाजीराजे आर पाटील हेच योग्य असून सर्व आदिवासी, दलित, कष्टकरी, शेतकरी व तसेच महिलांनी डॉ संभाजीराजे पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले.
शबरी माता संघटना चे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पूर्णपणे डॉ संभाजीराजे यांना या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य मतांनी निवडून आणतील हा विश्वास देखील देण्यात आला.
यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डॉ संभाजीराजे पाटील यांचा वाढता पाठिंबा बघता एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघात यावेळी परिवर्तन होण्याची दाट शक्यता लोकांमधून व्यक्त होतेय.