आरोपीस अटक : दागिने आणि मोबाइलही लंपास
पुणे – प्रेयसीला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर डोके भिंतीवर आपटून तिचा खून केला. घर अस्ताव्यस्त करून दागिने आणि मोबाइल चोरत घरफोडीचा बनाव करणाऱ्या प्रियकरास हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. आर्थिक वादातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
किसन सीताराम जगताप (46, रा. बेलसर, नारळीचा मळा, ता. पुरंदर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने 44 वर्षीय महिलेचा खून केला आहे. तिच्या मुलीने याबाबत तक्रार दिली आहे. ही महिला मुलगी आणि जावयासह वैदूवाडीत राहत होती. ती आणि किसन यांच्यात दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
दरम्यान, काही दिवसांपासून ती किसनकडे पैसे मागत होती. त्यातून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर किसनने तिचा खून केला. त्यानंतर घरफोडीचा बनाव करत दागिने, मोबाइल व एटीएम कार्ड घेऊन तो पसार झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध घेत आरोपीस त्यास जेरबंद केले. ही कारवाई युनिट-5 चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या पथकाने केली.