अमळनेर | प्रतिनिधी :- पाडळसरे माहेरून चावलखेडा ता. धरणगाव या आपल्या सासरी जाण्यासाठी दोन्ही मुलींसह निघालेली महिला लाेण फाट्यावर बसची वाट पाहत हाेती. तेव्हा भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने दाेन्ही मुलींना धडक देत उडवल्याने त्यातील एका ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर ितच्या साेबतची ७ वर्षीय चिमुकलीही गंभीर जखमी झाली. तमन्ना सिद्धार्थ भालेराव असे मृत मुलीचे नाव असून अर्चना भालेराव यात गंभीर जखमी झाली. या अपघातात मुलींची अाई मात्र थाेडक्यात बचावली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. जखमी मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
१७ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान लोण बु. येथे मामाकडे आलेल्या तमन्ना व अर्चना ह्या आपल्या गावी चावलखेडा ता. धरणगाव येथे जाण्यासाठी आई व मामासह लोण फाट्यावर बसची वाट पाहत उभ्या हाेत्या. तेव्हा अमळनेरकडून येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कार क्र. एमएच १९ बीयु ३५५३ ने अर्चना व तमन्ना या दोघांना जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका अधिक हाेता की, अपघातानंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कापसाच्या शेतात बांधावर जाऊन पलटी झाली. अपघातानंतर अर्चना व तमन्ना यांना मामा व जवळच्या लोकांनी उचलत दोन्ही मुली आणि कारच्या जखमी चालकाला अमळनेरकडे जाणाऱ्या खासगी वाहनात टाकून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरानी तमन्नास मृत घोषित केले