सोशल मिडीयावर माळी समाजावरील आक्षेपार्ह मजकुराच्या निषेधार्थ एरंडोल बंद; माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन.

Spread the love

एरंडोल :- सोशल मिडीयावर माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकून तो प्रसारीत केल्याच्या निषेधार्थ माळी समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.यावेळी समाजाच्यावतीने शहरातून निषेध मूकमोर्चा काढला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करून त्यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. माळी समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकून समाजाची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा या मागणीसाठी पोलीस स्थानकासमोर सुमारे तीन तास शेकडो समाजबांधवांनी ठिय्या मांडला होता.याबाबत माहिती अशी की, जितेंद्र अशोक महाजन यांना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर माळी समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकून तो प्रसारीत करण्यात
आल्याचे दिसून आले. जितेंद्र महाजन यांनी समाजाची सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी केल्याचे मित्रांना सांगितले.समाजाची सोशल मिडीयावर बदनामी करण्यात आल्याचे समजताच संतप्त झालेल्या हजारो समाजबांधवांनी पोलीसस्टेशनवर ठिय्या मांडून संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली.तसेच समाजाच्या बदनामीच्या निषेधार्थ आज शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.शहर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.दुपारी तीन वाजेनंतर बंद मागे घेण्यात आला. दरम्यान सकाळी दहा वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून समाजबांधवांनी निषेध मोर्चा काढून समजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणा-यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या पुतळ्यास जोडेमारो आंदोलन करून त्याचे दहन करण्यात आले.यावेळी संतप्त युवकांनी जोरदार घोषणा देवून घटनेचा निषेध केला.संतप्त झालेल्या समाजबांधवांनी पोलीस स्टेशनवर एकत्र येवून ठिय्या मांडला.समाजाची बदनामी करणा-यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी समाज बांधवांशी चर्चा करून गुन्हा नोंदविण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.दरम्यान कासोदा येथील एका अल्पवयीन युवकाने (काल-ता.२१) माळी समाजाबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकून तो प्रसारीत केला असल्याचे समजते.यावेळी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, दशरथ महाजन,कॉंग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन,रुपेश
महाजन,जगदीश ठाकूर,संजय महाजन,पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते,महात्मा फुले युवा क्रांती मंचचे संस्थापक अध्यक्ष कैलास महाजन,आरिफ शेख,युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,अहमद सय्यद,अकबर शेख,फारुख शेख,प्रकाश महाजन,माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,अनिल महाजन
यांचेसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.याबाबत जितेंद्र अशोक महाजन यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांचे सहकारी तपास करीत
आहेत.

मजकुराबाबत माझा कोणताही संबंध नाही-माजीमंत्री डॉ.सतीश पाटील.

काल माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चुकीची पोस्ट टाकण्यात आली होती.विधानसभा निवडणुकीमुळे माझे इंस्टाग्राम अकाऊंट एक कंपनी handal करीत होती.सुरुवातीला सदरच्या पोस्टमध्ये काहीही मजकूर नव्हता.मात्र त्यांनतर तीच पोस्ट एका व्यक्तीने आक्षेपार्ह मजकूर टाकून प्रसारीत केली.यामाध्ये माझा कोणताही सहभाग नाही.राजकीय जिवनात मी सर्व समाजाचा आदरच केला असून सदर घटनेबाबत पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींविरोधांत कडक कारवाई करावी.मला बदनाम करण्याचा प्रयत्न काही व्यक्ती मुद्दाम करीत असून चौकशीमध्ये ते समोर येईलच. कृपया समाजबांधवांनी माझ्याबाबत गैरसमज करून घेवू नये.तसेच सोशल मिडीयावर समाजविघातक पोस्ट टाकणा-या
समाजकंटकाविरोधात कडक कारवाई करावी.

मुख्य संपादक संजय चौधरी