पतीच्या उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूनंतर तीन तासांत पत्नीने संपवली जीवन यात्रा; दोघांचे एकाच चितेवर अंत्यसंस्कार

Spread the love

बीड :- पतीचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घरी पत्नीला कळताच धक्का सहन न झाल्याने अवघ्या काही वेळातच पत्नीने विष प्राशन करून जीवन संपविले.ही घटना खामकरवाडी (ता. शिरूर कासार) येथे गुरुवारी (दि.२१) सकाळी घडली. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीनेही जीवन संपविले. यानंतर दोघांचेही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बीडच्या खामकरवाडी गावातील या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत मिळालेली माहिती असी की, खामकरवाडी या गावातील रहिवासी असलेले शिक्षक कन्हैयालाल पांडुरंग खामकर (वय 48) हे शिरूर शहरांमध्ये वास्तवास होते. कन्हैयालाल यांचे बायपासचे ऑपरेशन झालेले होते. गेल्या काही दिवसांपासून खामकरवाडी येथे ते कुटुंबासहित राहत होते. गुरुवारी पहाटे त्यांच्या प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांना शिरूर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेची माहिती गावाकडे कळताच खामकर परिवारासह, गावावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. होता. तर इकडे आपल्या पतीच्या मृत्यूची बातमी पत्नी राहीताई कन्हैयालाल खामकर (वय 42) यांच्या कानावर पडताच त्यांना मोठा धक्का बसला. हा धक्का राहीताई यांना सहन न झाल्याने त्यांनी काही वेळाच्या आत त्यांनीही जीवन संपवले..

पहाटे पतीच्या निधनाने शोकाकूल आणि व्यथित झालेल्या त्यांच्या पत्नी राहीताई खामकर यांनी कोणालाही न समजू देता विषारी द्रव प्राशन केला. सकाळी सहा वाजता त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात नेले. यावेळी राहीताई खामकर यांनी उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या लोकांना मलादेखील माझ्या पतीच्या चितेवरच अग्निडाग द्या म्हणून सांगत होत्या.शिरूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर बीडला पुढील उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. खामकरवाडी येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर कन्नालाल खामकर आणि पत्नी राहीताई खामकर दोघांना अग्निडाग दिला. अंत्यविधीसाठी उपस्थित नागरिकांच्या अश्रूचा बांध फुटला.

मुख्य संपादक संजय चौधरी