आक्षेपार्ह पोस्टमुळे धरणगावात तणावपूर्ण बंद; भाजप व शिवेसेनेतर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

Spread the love

धरणगाव | प्रतिनिधी –

धरणगाव :- एका व्यक्तीने दुसऱ्या समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात शेअर केल्याने जिल्ह्यासह धरणगावात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त शिवसेना,भाजप पक्षातर्फे धरणगाव पोलिस निरीक्षक पवन देसले यांना निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
माजी मंत्री तथा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतिष पाटील यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये छेडछाड करुन एका समाजाबद्दल चुकीचे लिखाण समाजमाध्यमांवर प्रसारीत करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनात माजी आमदार डॉ.सतिष पाटील व कासोदा येथील नवाज सय्यद यांनी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतूने सोशल माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल संबंधितांवर कठोर शासन होणेबाबत भाजप व शिवसेना पक्षातर्फे स्वाक्षऱ्याचे निवेदन पोलीस निरक्षकांना देण्यात आले असून समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजप, शिवसेना पक्षातर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. धरणगाव पोलिस स्थानकाचे पो.नि. पवन देसले यांना भाजपचे नेते डी जी पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, शिवसेनेचे विनय भावे, शहरप्रमुख विलास महाजन यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. याप्रसंगी पी सी पाटील, शिरीष बयस, ऍड.संजय महाजन, जिजाबराव पाटील, कमलेश तिवारी, पुनीलाल महाजन, कैलास माळी, कन्हैय्या रायपुरकर, चंदन पाटील यांसह शिवसेनेचे अभिजित पाटील, अहमद पठाण, बाळासाहेब जाधव, मच्छिंद्र पाटील, प्रशांत देशमुख, भिका मराठे, पवन महाजन, जितेंद्र महाजन, भरत माळी, सुदर्शन भागवत, नरेश कट्यारे यांसह शिवसेना, भाजपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक संजय चौधरी