वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.

Spread the love

बाहेरगावाहून लहान भावाच्या लग्नाचे कपडे घेऊन गावी परत येवून घरी जात असताना बल्कर टॅंकरने दिली होती धडक.

एरंडोल :- जळगावकडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात टँकर चालकासह एरंडोल येथील पादचा-याचा मृत्यू झाला.अपघातात मयत झालेला युवक आईसह मालेगाव येथून विवाहाचे कपडे खरेदी करून पायी घरी येत होता तर त्याचे परिवारातील सदस्य मोटार सायकलने घरी गेले होते.याबाबत माहिती अशी की,आज पहाटे एक वाजेच्या सुमारास जळगाव कडून पारोळ्याकडे भरधाव वेगाने जाणारा टँकर क्रमांक एमएच १९ बीएच ९१२७ वरील
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर नाक्याजवळ असलेल्या हॉटेल जत्रा जवळ असलेल्या एका एका सिमेंट व आसारीच्या दुकानावर धडकला.टँकरने दुकानावर असलेल्या लोखंडी आसारी सुमारे दहा ते पंधरा फुट ओढून नेल्या व त्याठिकाणी असलेल्या झाडावर आदळला.या अपघातात टँकर चालक नाव फुलचंद वय 25 गाव चिलूला तालुका हैदरगड जिल्हा बाराबंकी हा जागीच ठार झाला तर रस्त्याने आईसोबत पायी चालत असलेला युवक शकील अ,नबी बागवान हा युवक गंभीर जखमी झाला.गंभीर जखमी शकील अ.नबी बागवान (वय ३५)यास प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथील मंदार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.मात्र सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उपचार सुरु असतांना तो मयत झाला.मयत युवक शकील बागवान हा अँग्लो उर्दू हायस्कूलचा संचालक होता.मयताची आई,भाऊ व वाहिनी हे घरात विवाह असल्याने मालेगाव येथे कपडे
खरेदी करण्यासाठी गेले होते.पहाटे एक वाजेच्या सुमारास बसस्थानकावर उतरल्यानंतर रिक्षा नसल्याने आसिफ नबी तांबोळी याने भाऊ शकील बागवान यास मोटार सायकल घेवून येण्याचे सांगितले.शकील बागवान हा मोटार सायकल घेवून आला. सदर मोटार सायकलवर आसिफ व त्याची पत्नी घरी गेले तर शकील बागवान हा त्याच्या आईसोबत पायी घरी जात होता.आसिफ याने पत्नीला घरी सोडल्यानंतर आई व भावास घेण्यासाठी येत असतांना त्यास अमळनेर नाक्याजवळ नागरिकांची गर्दी दिसल्याने तो थांबला व जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या भावाचा अपघात
झाल्याचे दिसले.अपघातात शकील बागवान याच्या दोन्ही पायावरून टँकर गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.दरम्यान टँकरच्या अपघात होताच जोरदार आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेवून मदतकार्य सुरु करून जखमी शकील यास बाहेर काढले.तसेच रुग्णवाहिका व पोलिसांना
माहिती दिली.अपघातग्रस्त टँकर एका झाडाला धडकल्यामुळे तसेच लोखंडी आसा-यांमध्ये अडकल्यामुळे पुढील अनर्थ टळला.याबाबत आसिफ नबी तांबोळीयांनी दिलेल्या तक्रारीवरून टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार किरण
पाटील तपास करीत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी