35 वर्षीय विवाहित महिला, 27 वर्षांच्या तरुणासोबत ठेवलेल्या अनैतिक संबंधात आंधळी, पतीनं केली मनाई दिली धमकी, पण नको ते घडलं?

Spread the love

बेळगाव :- गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधात मोठी वाढ झाली आहे. तसेच अनैतिक संबंधातून हत्येच्या घटनाही समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.कर्नाटक राज्यातील बेळगावच्या वन्नूर गावात ही घटना घडली. 35 वर्षांच्या एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. एका 27 वर्षांच्या तरुणासोबत या महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला या महिलेने संपवले.

नीलव्वा असे या महिलेचे नाव आहे. तसेच मागील 20 वर्षांपासून ती विवाहित आहे. तिचा पती 40 वर्षांचा होता. या दरम्यान, एका 27 वर्षांच्या महेश नावाच्या तरुणासोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. या अनैतिक संबंधात ती पूर्णपणे आंधळी झाली होती. तसेच महेशही या महिलेच्या प्रेमात आंधळा झाला होता.
मात्र, एकेदिवशी नीलव्वा हिच्या पतीला म्हणजे निंगोप्पाला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत माहिती झाले. यानंतर त्याला प्रचंड राग आला. तसेच त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीला धमकीही दिली होती. मात्र, पतीच्या या धमकीकडे तिने दुर्लक्ष करत आपल्या पतीला प्रियकराच्या मदतीने संपवण्याचा निर्णय घेतला. पतीची हत्या केली तर आपल्या संबंधातील अडसर दूर होऊन जाईल, असे नीलव्वाने महेशला सांगितले. यानंतर त्यांनी एक कट रचला आणि यल्लप्पा नावाच्या बाहुबलीला 1.5 लाखाची सुपारी दिली. यानंतर यल्लप्पाने निंगोप्पा झोपेत असताना त्याची हत्या केली. यानंतर आपल्या पतीची हत्या झाली आहे, असे नाटक नीलव्वाने केले. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी नीलव्वा, महेश आणि यल्लप्पा या 3 आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी