अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील किनीकदू गावचे रहिवासी असलेल्या शिक्षक दाम्पत्याने एका मुलीसह गंगाखेड येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. जवळपास २०० उंबरठ्यांचे गाव असलेल्या त्यांच्या मूळ गावी किनीकदू येथे घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली.
या तिघांच्या मृतदेहांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली होती. या तिघांच्या देखील आत्महत्येच कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील किनीकदु इथल्या रहिवासी शिक्षक कुटुंबाने परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे रुळावर झोपून सामूहिक आत्महत्या केली होती. गंगाखेड येथील खासगी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक मसनाजी तुडमे आणि त्यांची पत्नी आणि एक मुलगी या तिघांचा मृतदेह गंगाखेड जवळच्या धारखेड परिसरात रेल्वे रुळावर आढळल्याने एकच खळबळी उडाली होती.आत्महत्या करणारे मसनाजी तुडमे हे गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मसनाजी, त्यांची पत्नी रंजना आणि २१ वर्षांची मुलगी अंजली या तिघांनी रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या केली. गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून परभणीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर ते झोपले होते. त्याचवेळी त्यांच्या गंगावरून कोळसा वाहतूक करणारी मालगाडी गेली. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता.दरम्यान या तिघांच्याही आत्महत्याचे नेमके कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत. हे तिघेही काही संकटात होते का? त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता का या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत. तर या तिघांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणून एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या सामूहिक आत्महत्येमुळे ते राहत होते त्या गावावर शोककळा पसरली आहे.