छतरपूर – गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बनावट पोलिसाला अटक करण्यात आले असून ही घटना समोर आल्यानंतर आता पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भोपाळमध्ये ही घटना घडली. याठिकाणी भोपाळ जिल्हा न्यायालयाबाहेर पैसे उकळताना पकडलेल्या बनावट पोलिसाने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. आनंद सेन असे या बनावट पोलीसचे नाव आहे. पोलीस तपास त्याने सांगितले की, भोपाळला येण्यापूर्वी त्याने छतरपूरमध्ये पोलीस म्हणून काम केले होते. आरोपी हा तिथल्या एका पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात होता.
दरम्यान, 9 महिन्यांपूर्वी तो आपल्या कुटुंबासह भोपाळला आला होता. याठिकाणी अशोकागार्डन परिसरात तो राहत होता. एमपी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयहिंद शर्मा यांनी सांगितले की, आरोपीच्या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांशी सपंर्क केला जात आहे. तो बनावट पोलीस आहे. तसेच 4 वर्षांपासून तो पोलिसात काम करत होता. मात्र, आतापर्यंत ही माहिती कुणालाच कळू शकली नाही, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे
आरोपी आनंद सेन हा सोशल मीडियावरही खूप सक्रिया होता. इन्स्टाग्रामवर तो पोलीस अधिकारी, पोलीस वाहने, तसेच वर्दीमध्ये अनेक फोटो अपलोट करायचा. तसेच तो याच वर्दीच्या सहाऱ्यावर लहान दुकानदार आणि वाहन चालकांना थांबवून पैसे वसूल करायचा. दरम्यान, आरोपी आनंद सेन याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.