एरंडोल शिवसेना- विजेचे अवाजवी व अनियमित भारनियमन बंद करा

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- येथे समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन व शिवसेनेचे उपजिल्हासंघटक तथा माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागातील नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठून निवेदनाद्वारे शहरातील तसेच ग्रामीण भागातील अवाजवी व अनियमित भारनियमन बंद करावे अशी मागणी केली….
शहरात तसेच ग्रामीण भागात महावितरणने सूचित केलेल्या वेळ पेक्षा अवाजवी प्रमाणात व चुकीच्या वेळी भारनियमन केले जात आहे…

तसेच शहरातील काही भागात वीज पुरवठा सुरू तर काही भागात बंद करण्यात येत आहे, नियमितपणे वीज बिल भरून देखील वीज पुरवठा बंद केल्यामुळे नागरिक संभ्रमित झाले आहे…सध्या राज्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत… शेतकरी, शेतमजूर, नोकरदार वर्ग कामावरून रात्री थकून आल्यावर त्यांना घरी मात्र अंधाराचा सामना करावा लागतो, डासांचे प्रमाण वाढले असल्याने प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे….

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत आहे, जास्तीच्या भारनियमनामुळे शहरातील पिण्याच्या पाणीपुरवठा व शेतातील पिकांना होणार पाणीपुरवठा देखील विस्कळीत झालेला आहे…
त्यामुळे होणारे भारनियमन हे ABCD प्रणाली नुसार न करता सर्व भागात अल्प प्रमाणात, योग्य वेळी व सर्व भागात समान पध्दतीने करावे अन्यथा महावितरणला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे….

यावेळी युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, शिवसेनेचे शहरप्रमुख कुणाल महाजन, शहर संघटक नितीन बिर्ला, उपशहरप्रमुख सुनील मराठे, कुणाल पाटील, मोहन महाजन, राज पाटील, आकाश निंबाळकर, सिद्धार्थ परदेशी, अमोल परदेशी, स्वप्नील सावंत, नितीन धोबी, रोहित पाटील, नितीन कापडणे, विनय मोरे, जितेंद्र पाटील, राज परदेशी, शुभम पाटील, राहुल ठाकूर आदी उपस्थित होते.

टीम झुंजार