प्रशांत सरवदे (प्रतिनिधी) सावदा :– सावदा येथील महावीर चौकातील रिद्धी ज्वेलर्स या दुकानास सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान अचानक आग लागल्याने या आगीत मोठे नुकसान झाले आहे.
येथील मुख्य रस्त्यावर गौरव वानखेडे यांच्या मालकाचे रिद्धी ज्वेलर्स हे दुकान असून या दुकानास सायंकाळी ५.३० – वाजेच्या सुमारास आग लागली. हे दुकान बंद असताना अचानक ही आग लागली. दरम्यान, दुकानातून धुराचे लोट दिसू लागताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच दुकानाचे मालक तसेच अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. सुमारे १ तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या प्रसंगी कुशल जावळे, प्रदीप ठाकूर व सहकारी तसेच अग्निशमन दलाचे अविनाश पाटील व सहकाऱ्यांनी आग विझवण्यासाठी
सहकार्य केल. दरम्यान, या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर घटनास्थळाचा पंचनामा झाल्यानंतरच किती नुकसान झाले हे समजेल. दरम्यान माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांच्या भावाचे हे दुकान आहे. तर राजेश वानखेडे हे घटनेची माहिती मिळताच तत्काळ उपस्थित झाले अन् आग विझविण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान, या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. यात गौरव वानखेडे या युवा उद्योजकाचे मोठे नुकसान झाले आहे.