सुवर्ण मंदिरात ‘शिक्षा’ भोगणाऱ्या पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला; थोडक्यात बचावले,आरोपीस अटक

Oplus_131072
Spread the love

अमृतसर :- सुवर्ण मंदिराच्या गेटवर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर फायरिंग केली.त्यात ते बालंबाल वाचले आहेत. सध्या ते सुरक्षित आहेत. या हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

सेवा करताना हल्ला, हल्लेखोर पकडला

प्राप्त माहितीनुसार, ज्यावेळी सुखबीर सिंह यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी लगेचच धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी लोकांनी हल्लेखोरावर नियंत्रण राखले. त्यामुळे अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल हे या घटनेत बालंबाल बचावले.

हल्लेखोरावर सेवेकऱ्याची झडप

अकाली दल के नेता सुखबीर सिंह बादल हे सुवर्ण मंदिरात द्वारपाल म्हणून सेवा करत होते.त्यावेळी हा हल्ला झाला.ही सेवा त्यांना शिक्षेच्या स्वरुपात करायची होती. ते कार्य पार पाडतानाच हल्लेखोर आला त्याने आपल्याजवळील बंदुक काढली आणि बादल यांच्यावर रोखली. यानंतर पण कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी तेथे उपस्थित एका सेवकाने हल्लेखाराला पाहीले आणि त्याच्यावर त्याने झडप घातली.

सेवेकऱ्यामुळे वाचले बादल

ज्यावेळी सेवेकऱ्याने हल्लेखोरावर झडप घातली त्याचवेळी हल्लेखोराने बादल यांच्या दिशेने गोळी झाडली पण सेवेकऱ्याने घातलेल्या झडपेमुळे बंदुकीचा निशाणा चुकला आणि ती गोळी बाजूने गेली त्यामुळे बादल हे बालंबाल वाचले. या घटनेमुळे बादल यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

आरोपीची ओळख पटली

गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव नारायण सिंह चौडा असे आहे. त्याचा खलिस्तानी चळवळीशी संबंध आहे. याआधी तो काही हिंसक कारवायातही सक्रीय होता अशी माहिती समोर येत आहे. त्याने सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळी का झाडली. यामागे त्याचा काय इरादा होता यासह पोलिस त्याच्याशी संबंधित नेटवर्कचाही शोध घेत आहेत.

बादल यांच्या पत्नी पोहचल्या सुवर्णमंदिरात

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात एसएडी प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचल्या.

काय म्हणाले पोलिस आयुक्त?

अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले, “…हल्लेखोर पकडला गेला आहे. तपासात सर्व काही उघड होईल… सखोल कट होता की नाही हे तपासात उघड होईल… हा हत्येचा प्रयत्न होता पण तो (सुखबीर सिंग बादल) पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावले..”

या पाच प्रकरणांत बादल सरकार दोषी

2007 मध्ये सलाबतपुरा येथे डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांनी शिखांचे 10 वे गुरू श्री गुरू गोविंद सिंह यांच्यासारखे कपडे परिधान करून अमृत शिंपडण्याचे नाटक केले होते. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होऊनही बादल सरकारने माघार घेतली होती.
सुखबीर बादल यांनी त्यांचे वजन वापरून राम रहीमला माफी मिळवून दिली. शीख समाजाच्या संतापामुळे अखेर श्री अकाल तख्त साहिबने राम रहीमला माफी देण्याचा निर्णय घेतला.
बादल सरकारच्या कार्यकाळात काही लोकांनी बुर्ज जवाहर सिंग वाला येथील गुरुद्वारा साहिबमधून श्री गुरू ग्रंथ साहिबची चोरी केली होती. त्यानंतर बरगारी येथील गुरुद्वारा साहिबमधून श्री गुरू ग्रंथ साहिबचे 110 भाग चोरून बाहेर फेकण्यात आले. त्यामुळे शीख समाजात प्रचंड संताप होता. अकाली दल सरकार आणि तत्कालीन गृहमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी या प्रकरणी वेळीच चौकशी केली नाही.
खोटय़ा केसेसमध्ये मारल्या गेलेल्या शिखांना अकाली दल सरकार न्याय देऊ शकले नाही.
डेरा मुखीला कर्जमाफी दिल्यानंतर याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यात एसजीपीसी निधीतून अंदाजे 90 लाख रुपये खर्च करण्यात आले. सुखबीर बादल यांच्याशिवाय त्यांच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली.

मुख्य संपादक संजय चौधरी